Posts

Showing posts from 2021

स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव म्हणजे 'स्व'

माणूस जसा इतर लोकांविषयी, वस्तूंविषयी आणि घटनांविषयी जसा विचार करतो. तसाच तो आपल्या स्वतः विषयी देखिल विचार करीत असतो. माणसाला त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाची होणारी जाणिव म्हणजे 'स्व' होय. स्व जाणिवेमुळे माणूस आपल्या स्वतःकडे पाहू शकतो; स्वतःविषयी विचार करू शकतो; स्वतःचे मूल्यमापन करू शकतो, स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो. थोडक्यात स्वतःला समजून घेतो. स्वतःला समजून घेणे म्हणजे आपल्या आवडी समजून घेणे; स्वतःच्या क्षमता समजून घेणे; स्वतःचे  गुण-दोष समजून घेणे होय.