Posts

Showing posts from December, 2022

माणसाच्या प्रवाही अनुभवाचे मानसशास्त्रीय आकलन: डॉ. एन.एस. डोंगरे

Image
माणसाच्या प्रवाही अनुभवाचे मानसशास्त्रीय आकलन  डॉ. एन. एस. डोंगरे  मानसशास्त्र विभाग  एस.पी.डी.एम. महाविद्यालय शिरपूर, जि. धुळे ashay.dongare@gmail.com    जेव्हा आपण काही करतो, तेव्हा आपण त्यात इतके मग्न होऊन जातो की, बाकीचे जग गायब झाल्यासारखे वाटते. ते करताना आपले मन भटकत नसते, हातामधील कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलेले असते, इतकेच नव्हे तर आपणाला स्वतःबद्दल देखील फारशी जाणीव उरत नाही, वेळ गायब झाल्याचा अनुभव येत असतो. आणि जेव्हा माणूस त्या अनुभवांमधून बाहेर पडतो, तेव्हा त्याला प्रत्यक्ष ‘आपण किती वेळ घालविला’ याची जाणीव होत असते. बहुदा आपण अपेक्षित वेळेपेक्षा अधिक तर कधी त्यापेक्षा काहीसा कमी वेळ घालवलेला असतो. बहुतेक लोक अशा अवस्थेचा अनुभव घेत असतात. अशा अवस्थेला काही मानसशास्त्रज्ञ ‘ वर्तमानात जगणे’ म्हणतात, तर काही ‘बोधावस्था किंवा चेतनेची सर्वोच्च अवस्था ’ म्हणतात. तर काही मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तीच्या कार्यमग्न होण्याच्या या अनुभवाला ‘ प्रवाही अनुभव’ म्हटले आहे. हे नाव मिहली सिसीक्झेन्टमिहली या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने त्याच्या Flow: The Psychology of Happiness 1   य