Posts

FYBA SEM II

प्रकरण १ ले  बोधात्मक प्रक्रिया   आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात त्याची जाणीव आपल्याला वेदनेंद्रियामार्फत होत असते. वेदनेंद्रियांनाच ज्ञाननेंद्रिये किंवा पंचेंद्रिये देखील म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही मानवाची पाच वेदनेंद्रिये आहेत. आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. त्या सर्व घटनांची जाणिव आपल्याला आपल्या वेदनेंद्रियांमार्फत होते. परंतु त्या सर्वच घटनांचा आपल्याला ‘बोध’ (अर्थ समजणे) होत नाही. कारण आपल्या वेदन इंद्रियांची क्षमता मर्यादित असते. अतिसूक्ष्म धूलिकण आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत, अत्यल्प वास आपल्या नाकाला जाणवत नाही, अतिसूक्ष्म आवाज आपल्याला कानाने ऐकू येत नाही. आपल्या सभोवतालच्या परिसरातील गोष्टींचा आपल्याला जो ‘अर्थबोध’ होतो, त्या मानसिक प्रक्रियेला संवेदन किंवा बोधन म्हणतात. अगोदर माणसाला वेदनेंद्रियमार्फत परिसरातील उद्दीपकांची जाणीव होते व त्यानंतर संवेदन घडते. उद्दीपकांची नुसती जाणीव होणे म्हणजे वेदन होय तर उद्दीपकाचे अर्थबोधन होणे म्हणजे संवेदन. उदा. नुसते व्याख्यान ऐकणे म्हणजे वेदन आहे; तर व्याख्यानाचा अर्थ समजणे म्हणजे संवेदन आहे. यावरुन वेदन
  मानवी जीवन हे सर्वश्रेष्ट आहे. ते सर्वश्रेष्ट आहे, कारण ते तीनही काळावर आपली छाप सोडते. भूतकाळातून ते स्फूर्ती आणि प्रेरणा घेते, वर्तमान काळात ते कार्यक्षिल आणि कार्यमग्न राहून परस्पर सहकार्याच्या जोरावर विकास साधते, भविष्याबद्दल ते आशावादी राहून आपला आणि इतरांच्या जगण्याचा अर्थ शोधत राहते.  मात्र असे दिसून येते अनेक लोक संपूर्ण मानवी जीवन व्यतीत करतात, मात्र ते स्व:ताला शोधत नाहीत आणि स्वतःला ओळखतही नाहीत. जसे  मी कोण आहे ? माझे कर्तव्य काय आहे ? आणि मी काय करायला हवे? हे तीन प्रश्न तसे खूपच सूचक आहेत.  जो पर्यंत मी कोण आहे? याचा शोध लागत नाही तो पर्यंत आपले जीवन म्हणजे शीड नसलेले भरकटलेले जहाज किंवा वावटळ मध्ये भरकटलेला कागदाचा तुकडा या प्रमाणे आहे.  आज आपण पाहतो की अनेकांची अवस्था अगदी या प्रमाणे झाली आहे. ना खाण्याची भ्रांत, ना जगण्याची आस, आहे तो दिवस मोबाइलच्या स्क्रीन वर मनोरंजन करून मागे ढकला एवढेच काय ते ध्येय आणि उदिष्ट सभोवताली दिसून येत आहे. तर मग स्व:चा शोध कसा लागणार आणि स्व:चा शोध लागणार नाही तर जीवन प्रवाही कसे होणार.  जीवनाचा प्रवाह थांबला की ते गढूळ होणार आणि त्यातू

मोलकरीण स्त्रीच्या हस्ते रावसाहेब कसबेचा सत्कार

Image
मोलकरीण महिलेच्या हस्ते झाला विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे सरांचा सत्कार   प्रसिद्ध विचारवंत मा. प्रा. रावसाहेब कसबे यांचा काल नाशिक येथे ८० व्या वाढदिवसानिमित्त  कामिनाताई किसन खिल्लारे (माझी मोठी बहीण) हिच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला... त्यावेळी विचारपिठावर मा. कसबे सरांच्या पत्नी आणि मा. उत्तम कांबळे साहेब उपस्थित होते... ताई नाशिक येथे स्वतः धुनी-भांडी करण्याचं काम करते...तसच तिनं त्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना उभी केली... त्यामुळे तिला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी होण्याचा...आणि रावसाहेब कसबे सरांसारख्या व्यक्तीचा सन्मान करण्याचा बहुमान मिळाला...   ताई आणि जिजाजी तसे दोघेही अक्षरशत्रु...म्हणजे अशिक्षित आहेत... पण त्यांना शिक्षणाविषयी आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी खुप तळमळ... ही तळमळ मी प्राध्यापक झाल्यामुळे त्यांच्यात आली...माझं बारावीनंतरच शिक्षण ताईनं नाशिकला केलं...माझ्या जिजाजीना वाचता येत नाही.. पण पुस्तके विकत घेण्याची खूप आवड...मी एकदा त्यांना विचारलं... तुमच्या घरात कोणीच वाचत  नाही; मग पुस्तक का बर विकत घेता?... तेव्हा त्यांनी 

भीती जगात नाही, तर मनात आहे..

Image
  भिती जगात नाही, तर मनात आहे  दिवाळीच्या सुट्टीत गावी आलोय...सकाळी रोज फिरण्याची सवय असल्यानं... नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता फिरायला निघालो... हवेत छान गारठा दाटलेला... पुर्वेला लालबुंद सुर्य... अंगावरील घनदाट अंधार लोटत... स्वयम् प्रकाशी... सृष्टी उजाळण्यासाठी हळूहळू उगवत होता... मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात मी सुध्दा चालत होतो…रस्त्याच्या आजुबाजुला झालेला बदल न्याहाळत होतो…शेलुबाजार रोडवर चिखली गावाजवळ खुपचं बदल झालेला…दोन्ही बाजूला प्लॉटिंग लेआउट पडलेले…चिखली फाट्यावर एक भलं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेलं…त्याला लागूनच खारी-टोस्टची फॅक्टरी…सगळ्या गोष्टी नवशहरीकरणाच्या दिशेनं चाललेल्या…      आता सगळं उजाडलं होतं…सूर्याची कोवळी किरणे पसरू लागली…व्यायाम करण्यासाठी एका प्लॉटिंग लेआउट मध्ये मी प्रवेश केला…तेवढ्यात पाच सहा कुत्र्यांची झुंड माझ्या अंगावर धावली…मी आपला हातात मोबाईल धरून शांत थांबलेला…त्यात काळ्या रंगाचा कुत्रा…खूपच मस्तवाल…तब्येतीने गुबगुबीत…उंचपुरा अन् धाडधिपाड…बाकी तीन मात्र सामान्य प्रकृतीचे…जेव्हा मी जाग्यावर शांत उभा राहिलो…तेव्हा ते माझ्यापासून काही अंतरावर उभे राह

स्व-संकल्पना

  2.3.'Self Concept': Self-concept is the image we create of ourselves. In this way we evaluate our behavior and abilities. For example, beliefs such as "I am a good friend" or "I am a kind person" are part of our self-concept. So self-concept is our self-perception, belief, perception or view of ourselves. Self-concept is a term; which we use to describe the beliefs, interests, skills and tendencies we hold about ourselves. This includes everything from your behavior and abilities to your unique traits. Self-concept is not fixed but can change over time as we learn, grow and experience new things . From this we realize that; Self-concept is not innate; So it develops from experience after birth. Are we capable of doing something? Self worth or not? How do you feel about yourself? It is also called self-perception . It is important; Because it affects our motivation, attitude and behavior .  In short, self-concept is a collection of beliefs about yourself a

SYBA Sem I Test- II

  प्रश्न १. ला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच )५ वैकासिक बदलांचा अर्थ काय आहे? जीवनकक्षा म्हणजे काय? मनोविश्लेषण सिद्धांताचे संस्थापक कोण आहेत लैंगिक पेशी म्हणजे काय? जन्माचे प्रकार कोणते आहेत? एरिक्सनने कोणता सिद्धांत मांडला आहे? कारक विकासाचा अर्थ लिहा. पियाजे यांनी मांडलेल्या सिद्धांताचे नाव काय आहे? प्रश्न २.रा थोडक्यात टिपा लिहा (कोणतेही दोन) १० १.विकासाचे क्षेत्रे २.जन्माचे टप्पे ३.स्व-समज ४. पायाळू मुल प्रश्न ३. रा सविस्तर उत्तर लिहा (कोणताही एक) १० जीवन कक्षा विकासातील मुलभूत मुद्दे स्पष्ट करा. जन्मपूर्व विकासाची व्याख्या सांगून जन्माचे विविध प्रकार स्पष्ट करा.

TYBA SEM I Test II

 प्रश्न १. ला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच) संप्रेषणाची व्याख्या लिहा. सहानुभूती म्हणजे काय? ठामप्रतिपादन कशाला म्हणतात? घनिष्ठ नातेसंबंधाची व्याख्या सांगा. प्रेमाचा त्रिकोणी सिद्धांत कोणी मांडला? ऐच्छिक निपुत्रिकता म्हणजे काय? करिअर किंवा कारकीर्दची व्याख्या लिहा? प्रश्न २.रा थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन) करियर निवड घटस्फोट रोखणे  इंटरनेट आणि नातेसंबंध प्रश्न ३.रा सविस्तर उत्तर लिहा (कोणताही एक) संघर्षाची व्याख्या सांगून संघर्षाचे विविध प्रकार स्पष्ट करा. विवाहाच्या रुढीवादी प्रारूपास आव्हान देणारे घटक सविस्तर लिहा.

FYBA प्रथम सत्र चाचणी क्र. २

  प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच) ०५ मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या सांगा? वर्तन म्हणजे नेमकं काय ? Psychology इंग्रजी शब्द कोणत्या दोन शब्दांपासून तयार झाला? व्यक्तिमत्वाची व्याख्या लिहा. Superego या इंग्रजी शब्दाचा अर्थ सांगा. इदमची  व्याख्या सांगा. चिकित्सा मानसशास्त्र कशाला म्हणतात? प्रश्न दुसरा टिपा द्या. (कोणत्याही दोन) १० हिपोक्रेटचा सिद्धांत प्रायोगिक निरीक्षण पद्धत स्व  रचनावाद   प्रश्न तिसरा कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.10 मानसशास्त्राची व्याख्या सांगून मानसशास्त्राच्या कोणत्याही तीन अभ्यास पद्धतींची माहिती लिहा. व्यक्तिमत्वाची व्याख्या सांगून व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.