Posts

Showing posts from 2023

मोलकरीण स्त्रीच्या हस्ते रावसाहेब कसबेचा सत्कार

Image
मोलकरीण महिलेच्या हस्ते झाला विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे सरांचा सत्कार   प्रसिद्ध विचारवंत मा. प्रा. रावसाहेब कसबे यांचा काल नाशिक येथे ८० व्या वाढदिवसानिमित्त  कामिनाताई किसन खिल्लारे (माझी मोठी बहीण) हिच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला... त्यावेळी विचारपिठावर मा. कसबे सरांच्या पत्नी आणि मा. उत्तम कांबळे साहेब उपस्थित होते... ताई नाशिक येथे स्वतः धुनी-भांडी करण्याचं काम करते...तसच तिनं त्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना उभी केली... त्यामुळे तिला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी होण्याचा...आणि रावसाहेब कसबे सरांसारख्या व्यक्तीचा सन्मान करण्याचा बहुमान मिळाला...   ताई आणि जिजाजी तसे दोघेही अक्षरशत्रु...म्हणजे अशिक्षित आहेत... पण त्यांना शिक्षणाविषयी आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी खुप तळमळ... ही तळमळ मी प्राध्यापक झाल्यामुळे त्यांच्यात आली...माझं बारावीनंतरच शिक्षण ताईनं नाशिकला केलं...माझ्या जिजाजीना वाचता येत नाही.. पण पुस्तके विकत घेण्याची खूप आवड...मी एकदा त्यांना विचारलं... तुमच्या घरात कोणीच वाचत  नाही; मग पुस्तक का बर विकत घेता?... तेव्हा त्यांनी 

भीती जगात नाही, तर मनात आहे..

Image
  भिती जगात नाही, तर मनात आहे  दिवाळीच्या सुट्टीत गावी आलोय...सकाळी रोज फिरण्याची सवय असल्यानं... नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता फिरायला निघालो... हवेत छान गारठा दाटलेला... पुर्वेला लालबुंद सुर्य... अंगावरील घनदाट अंधार लोटत... स्वयम् प्रकाशी... सृष्टी उजाळण्यासाठी हळूहळू उगवत होता... मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात मी सुध्दा चालत होतो…रस्त्याच्या आजुबाजुला झालेला बदल न्याहाळत होतो…शेलुबाजार रोडवर चिखली गावाजवळ खुपचं बदल झालेला…दोन्ही बाजूला प्लॉटिंग लेआउट पडलेले…चिखली फाट्यावर एक भलं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेलं…त्याला लागूनच खारी-टोस्टची फॅक्टरी…सगळ्या गोष्टी नवशहरीकरणाच्या दिशेनं चाललेल्या…      आता सगळं उजाडलं होतं…सूर्याची कोवळी किरणे पसरू लागली…व्यायाम करण्यासाठी एका प्लॉटिंग लेआउट मध्ये मी प्रवेश केला…तेवढ्यात पाच सहा कुत्र्यांची झुंड माझ्या अंगावर धावली…मी आपला हातात मोबाईल धरून शांत थांबलेला…त्यात काळ्या रंगाचा कुत्रा…खूपच मस्तवाल…तब्येतीने गुबगुबीत…उंचपुरा अन् धाडधिपाड…बाकी तीन मात्र सामान्य प्रकृतीचे…जेव्हा मी जाग्यावर शांत उभा राहिलो…तेव्हा ते माझ्यापासून काही अंतरावर उभे राह

स्व-संकल्पना

  2.3.'Self Concept': Self-concept is the image we create of ourselves. In this way we evaluate our behavior and abilities. For example, beliefs such as "I am a good friend" or "I am a kind person" are part of our self-concept. So self-concept is our self-perception, belief, perception or view of ourselves. Self-concept is a term; which we use to describe the beliefs, interests, skills and tendencies we hold about ourselves. This includes everything from your behavior and abilities to your unique traits. Self-concept is not fixed but can change over time as we learn, grow and experience new things . From this we realize that; Self-concept is not innate; So it develops from experience after birth. Are we capable of doing something? Self worth or not? How do you feel about yourself? It is also called self-perception . It is important; Because it affects our motivation, attitude and behavior .  In short, self-concept is a collection of beliefs about yourself a

SYBA Sem I Test- II

  प्रश्न १. ला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच )५ वैकासिक बदलांचा अर्थ काय आहे? जीवनकक्षा म्हणजे काय? मनोविश्लेषण सिद्धांताचे संस्थापक कोण आहेत लैंगिक पेशी म्हणजे काय? जन्माचे प्रकार कोणते आहेत? एरिक्सनने कोणता सिद्धांत मांडला आहे? कारक विकासाचा अर्थ लिहा. पियाजे यांनी मांडलेल्या सिद्धांताचे नाव काय आहे? प्रश्न २.रा थोडक्यात टिपा लिहा (कोणतेही दोन) १० १.विकासाचे क्षेत्रे २.जन्माचे टप्पे ३.स्व-समज ४. पायाळू मुल प्रश्न ३. रा सविस्तर उत्तर लिहा (कोणताही एक) १० जीवन कक्षा विकासातील मुलभूत मुद्दे स्पष्ट करा. जन्मपूर्व विकासाची व्याख्या सांगून जन्माचे विविध प्रकार स्पष्ट करा.

TYBA SEM I Test II

 प्रश्न १. ला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच) संप्रेषणाची व्याख्या लिहा. सहानुभूती म्हणजे काय? ठामप्रतिपादन कशाला म्हणतात? घनिष्ठ नातेसंबंधाची व्याख्या सांगा. प्रेमाचा त्रिकोणी सिद्धांत कोणी मांडला? ऐच्छिक निपुत्रिकता म्हणजे काय? करिअर किंवा कारकीर्दची व्याख्या लिहा? प्रश्न २.रा थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन) करियर निवड घटस्फोट रोखणे  इंटरनेट आणि नातेसंबंध प्रश्न ३.रा सविस्तर उत्तर लिहा (कोणताही एक) संघर्षाची व्याख्या सांगून संघर्षाचे विविध प्रकार स्पष्ट करा. विवाहाच्या रुढीवादी प्रारूपास आव्हान देणारे घटक सविस्तर लिहा.

FYBA प्रथम सत्र चाचणी क्र. २

  प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच) ०५ मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या सांगा? वर्तन म्हणजे नेमकं काय ? Psychology इंग्रजी शब्द कोणत्या दोन शब्दांपासून तयार झाला? व्यक्तिमत्वाची व्याख्या लिहा. Superego या इंग्रजी शब्दाचा अर्थ सांगा. इदमची  व्याख्या सांगा. चिकित्सा मानसशास्त्र कशाला म्हणतात? प्रश्न दुसरा टिपा द्या. (कोणत्याही दोन) १० हिपोक्रेटचा सिद्धांत प्रायोगिक निरीक्षण पद्धत स्व  रचनावाद   प्रश्न तिसरा कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.10 मानसशास्त्राची व्याख्या सांगून मानसशास्त्राच्या कोणत्याही तीन अभ्यास पद्धतींची माहिती लिहा. व्यक्तिमत्वाची व्याख्या सांगून व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.

स्व-संकल्पना (Self Concept)

 'स्व-संकल्पना' (Self Concept) ही एक संज्ञा आहे; जी आपण स्वतःबद्दल बाळगत असलेले विश्वास,अभिरुची,कौशल्ये आणि प्रवृत्तीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते. यात आपले वर्तन आणि क्षमतांपासून ते अद्वितीय वैशिष्ट्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. आमची स्व-संकल्पना निश्चित नाही परंतु आपण जसे शिकतो, वाढतो आणि नवनवीन अनुभव घेतो तसतसी काळानुसार बदलू शकते. यावरून आपल्या हे लक्षात येते; स्व संकल्पना हि जन्मजात नाही; तर ती जन्मानंतरच्या अनुभवातून विकसित होते.  

व्यक्तिमत्त्वांचे सिद्धांत

हिपोक्रेटस: हा  इ .स. पूर्व पाचव्या शतकातील एक  प्राचीन   ग्रीक  वैद्य होता. वैद्यकशास्त्राच्या इतिहासामधील सर्वात थोर व्यक्तींपैकी एक हिपोक्रेटस हा पश्चिमात्य वैद्यकीय विद्येचा जनक समजला जातो. रोग्यांना तपासणे, रोगाचा इतिहास नोंद करून ठेवणे इत्यादी कला त्याने विकसत केल्या.त्याने दिलेली वैद्यकीय नीतीची शपथ  हिपोक्रेटसची शपथ  म्हणून ओळखली जाते. हिप्पोक्रेट्सने व्यक्तिमत्त्वांचे चार मोठ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. हिप्पोक्रेट्सने असा सिद्धांत मांडला की व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आणि मानवी वर्तन हे शरीरातील चार द्रव ("विनोद") शी संबंधित चार स्वतंत्र स्वभावांवर आधारित आहेत: कोलेरिक स्वभाव (यकृतातून पिवळे पित्त), उदास स्वभाव (मूत्रपिंडातून काळे पित्त), स्वच्छ स्वभाव (हृदयातून लाल रक्त), आणि ... १). कोलेरिक हा व्यक्तिमत्व प्रकार उत्कट, स्पष्टवक्ता, स्पर्धात्मक, दृढनिश्चयी, प्रबळ इच्छाशक्ती आणि साहसी आहे. सहसा, कोलेरिक हे ध्येय-केंद्रित असतात आणि ते खूप तार्किक आणि विश्लेषणात्मक असू शकतात.  ते विशेषतः सामाजिक नसतील.  प्रत्येकजण विशिष्ट व्यक्तिमत्वाचा प्रकार आणि अद्वितीय वैश

चाचणी क्रमांक १

 प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच) ०५ मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या सांगा?व र्तन म्हणजे नेमकं काय ?P sychology इंग्रजी शब्द कोणत्या दोन शब्दांपासून तयार झाला?व्य क्तिमत्वाची व्याख्या लिहा.P Persona या इंग्रजी शब्दाचा अर्थ सांगा.नै सर्गिक निरीक्षणाची व्याख्या सांगा.च चीकित्सा मानसशास्त्र कशाला म्हणतात? प्रश्न दुसरा टिपा द्या. (कोणत्याही दोन) १० समुपदेशन मानसशास्त्रप्रा योगिक निरीक्षण पद्धतव्य व्यक्तिमत्वव वर्तनवाद  प्रश्न तिसरा कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.10 मानसशास्त्राची व्याख्या सांगून मानसशास्त्राच्या कोणत्याही पाच शाखांची माहिती लिहा.व्य व्यक्तिमत्वाची व्याख्या सांगून व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.

व्यक्तिमत्वाला आकार देणारे घटक

  २. १. व्यक्तिमत्वाला आकार देणारे घटक (Factors of shaping Personality) : आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे किंवा व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत योगदान देणारे अनेक घटक आहेत. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण करून ते आपण सहज समजू शकतो. ते घटक खालीलप्रमाणे सांगता येतात.  १ . अनुवांशिक देणगी (Genetic endowment) : आपल्या वर्तनाची काही वैशिष्ट्ये हे अनुवांशिक आहेत. जी आपल्याला पूर्वजाकडून वारशाने मिळतात. शारीरिक उंची, रंग, रूपसौंदर्य, सडपातळपणा, निपुणता, बौद्धिक क्षमता, शिकण्याची क्षमता, तार्किक सामर्थ्य, आवडी-निवडी इत्यादी काही वैशिष्ट्ये पूर्वीच्या पिढीकडून  वारशाने मिळतात. शारीरिक किंवा मानसिक गुण वैशिष्ट्यांचे अनुवांशिकरित्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणे म्हणजे अनुवांशिकता आहे. जशी खाण तशी माती ही म्हण अनुवांशिकता सूचित करते. तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर ‘तुमच्या घरात पूर्वी कोणाला हा आजार झाला होता का?’ असा प्रश्न विचारुन हा आजार अनुवांशिक आहे का? याचा शोध डॉक्टर घेतात. ही अनुवांशिक देणगी एका पिढीकडून-दुसऱ्या पिढीकडे ‘जीन’ ( genes ) च्या माध्यमातून संक्रमित केली जाते. या सर्