Posts

Showing posts from April, 2020

गुलमोहर

Image
गुलमोहर आठवणींचे प्रत्येक क्षण काटेरी होत जातात मन रक्ताळतं एकाकीपणात वाटतं एकदातरी बघावा तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावरचा गुलमोहर ….. डॉ. नागोराव डोंगरे , शिरपुर मो. 8600304309

लॉकडाऊन आणि सकारात्मकता

Image
 लॉकडाऊन आणि सकारात्मकता       संपूर्ण जगात कमी अधिक प्रमाणात सगळीकडे लॉकडाऊन सुरु आहे. कोरोना महामारीतून सुटका करण्याचा एक हमखास उपाय म्हणून संपूर्ण जग लॉकडाऊन कडे बघत आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण स्वतःहून स्विकारतो किंवा निवडतो तेव्हा ती आपल्याला निश्चत आनंद देणारी असते. पण जेव्हा एखादी गोष्ट आपली मानसिक तयारी नसताना लादली जाते, तेव्हा ती मात्र त्रासदायक वाटण्याची अधिक शक्यता असते. लॉकडाऊन आपल्या सुरक्षेसाठी जरी असला तरीही आपली मानसिक तयारी नसताना लादलेला खबरदारीचा एक उपाय आहे. ज्यात आपल्याला घरात राहूनच कोरोना महामारीला संपवायचं आहे. तिचा जगभर होणारा फैलाव रोखायचा आहे. आपल्या घरात राहून वारंवार हात धुणं, सॅनेटाईज करणं, घराबाहेर पडल्यावर सुरक्षित अंतर ठेऊन वागणं हि खबरदारी सर्वांनी घेणं आवश्यक आहे. आपल्यापैकी बहुतेक लोक दररोज हि काळजी घेत असतीलच, परंतु काहींकडून हलगर्जीपणा जर झाला तर आपल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. "मला जसं वाटेल तसं मी वागेन" हे व्यक्ती स्वातंत्र्य जपण्याची हि वेळ नाही. आपण एकमेकांशी जोडलेले आहोत. म्हणून स्वतःची काळजी

सकारात्मकतेकडून आनंदाकडे

Image
सकारात्मकतेकडून आनंदाकडे डॉ. नागोराव डोंगरे, मानसशास्त्र विभाग,एस.पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे  मानसशास्त्र हे माणसाच्या वर्तनाचं अभ्यास करणारं शास्त्र आहे. आपल्या वर्तनाने इतरांना दुःख  होणार नाही, सर्वांचे हित साधले जाईल, ज्यात आपलं देखील हित समाविष्ट असेल, अशा वर्तनाला आपणास सकारात्मक वर्तन म्हणता येईल. परंतु जेव्हा काय सकारात्मक आणि काय नकारात्मक हे ठरवायचं असतं, तेव्हा आपण स्वतःच्या स्वार्थी प्रवृतीं, आपल्या पारंपारिक धार्मिक श्रद्धा, सामाजिक चालीरीती आणि आपले वैयक्तिक पूर्वग्रह यानुसार आपण ते  ठरवीतो.  त्यामुळे निश्चितच सकारात्मकता आणि नकारात्मकता यांच्या संकुचित व्याख्या तयार होऊ शकतात. संकुचित व्याख्या कोणत्याही शास्त्रात उचित ठरणार नाहीत. तशाच त्या मानसशास्त्राला देखील योग्य ठरणार नाहीत. माणसाकडून होणारे कोणतेही वर्तन जे इतराना त्रासदायक ठरणारे, इतरांचा आनंद हिरावून घेणारे, त्यांची सुखशांती घालविणारे, समाजात दुही माजविणारे, विसंवाद निर्माण करणारे, इतरांसोबत स्वतःचा आनंद कमी करणारे वर्तन सकारात्मक वर्तन होऊ शकणार नाही. सकारात्मक वर्तनाला जातीपाती, धर्म आण

सकारात्मक गुण

Image
         सकारात्मक गुण  कोणत्याही माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या अंगी असणाऱ्या  गुण-दोषांचं संमिश्रण असतं. अगदी महापुरुष देखील याला अपवाद नसतात. प्रत्येकाच्या अंगी जसे गुण असतात तसेच काही दोष देखील असतात. हे नाकारता येणार नाही.  काही लोकांमध्ये गुणाचं प्रमाण अधिक असतं तर काहींमध्ये दोदोषांचं प्रमाण अधिक असतं. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे लोकांचं व्यक्तिमत्व त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांनी  उठून दिसतं, तर काही लोक आपल्या दोषांमुळे लोकांमध्ये प्रसिद्ध होतात. कोणी सकारात्मक गुणांनी प्रसिद्ध व्हायचं की नकारात्मक गुणांनी व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु  माणसाची ओळख  समाजात निर्माण करण्यात  त्याच्या अंगी असलेले गुणदोष अत्यंत महत्वाची भूमिका पार पडतात, ही काळ्या गडावरील रेष  आहे.       माणसाच्या स्वतःवर आणि त्याच्या अवती-भोवती असणाऱ्या परिस्थितीवर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या  गुणांना सद्गुण अथवा सकारात्मक गुण म्हणता येईल. ज्या गुणांमुळे व्यक्ती स्वतः आनंदी बनतो आणि इतरांना देखील आनंदी करतो. सकारात्मक गुण माणसाला वेगळ्या उंचीवर  नेतात . व्यक्तिला स्वतःला आणि त्याच्या