Posts

Showing posts from 2024

FYBA SEM II

प्रकरण १ ले  बोधात्मक प्रक्रिया   आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात त्याची जाणीव आपल्याला वेदनेंद्रियामार्फत होत असते. वेदनेंद्रियांनाच ज्ञाननेंद्रिये किंवा पंचेंद्रिये देखील म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही मानवाची पाच वेदनेंद्रिये आहेत. आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. त्या सर्व घटनांची जाणिव आपल्याला आपल्या वेदनेंद्रियांमार्फत होते. परंतु त्या सर्वच घटनांचा आपल्याला ‘बोध’ (अर्थ समजणे) होत नाही. कारण आपल्या वेदन इंद्रियांची क्षमता मर्यादित असते. अतिसूक्ष्म धूलिकण आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत, अत्यल्प वास आपल्या नाकाला जाणवत नाही, अतिसूक्ष्म आवाज आपल्याला कानाने ऐकू येत नाही. आपल्या सभोवतालच्या परिसरातील गोष्टींचा आपल्याला जो ‘अर्थबोध’ होतो, त्या मानसिक प्रक्रियेला संवेदन किंवा बोधन म्हणतात. अगोदर माणसाला वेदनेंद्रियमार्फत परिसरातील उद्दीपकांची जाणीव होते व त्यानंतर संवेदन घडते. उद्दीपकांची नुसती जाणीव होणे म्हणजे वेदन होय तर उद्दीपकाचे अर्थबोधन होणे म्हणजे संवेदन. उदा. नुसते व्याख्यान ऐकणे म्हणजे वेदन आहे; तर व्याख्यानाचा अर्थ समजणे म्हणजे संवेदन आहे. यावरुन वेदन
  मानवी जीवन हे सर्वश्रेष्ट आहे. ते सर्वश्रेष्ट आहे, कारण ते तीनही काळावर आपली छाप सोडते. भूतकाळातून ते स्फूर्ती आणि प्रेरणा घेते, वर्तमान काळात ते कार्यक्षिल आणि कार्यमग्न राहून परस्पर सहकार्याच्या जोरावर विकास साधते, भविष्याबद्दल ते आशावादी राहून आपला आणि इतरांच्या जगण्याचा अर्थ शोधत राहते.  मात्र असे दिसून येते अनेक लोक संपूर्ण मानवी जीवन व्यतीत करतात, मात्र ते स्व:ताला शोधत नाहीत आणि स्वतःला ओळखतही नाहीत. जसे  मी कोण आहे ? माझे कर्तव्य काय आहे ? आणि मी काय करायला हवे? हे तीन प्रश्न तसे खूपच सूचक आहेत.  जो पर्यंत मी कोण आहे? याचा शोध लागत नाही तो पर्यंत आपले जीवन म्हणजे शीड नसलेले भरकटलेले जहाज किंवा वावटळ मध्ये भरकटलेला कागदाचा तुकडा या प्रमाणे आहे.  आज आपण पाहतो की अनेकांची अवस्था अगदी या प्रमाणे झाली आहे. ना खाण्याची भ्रांत, ना जगण्याची आस, आहे तो दिवस मोबाइलच्या स्क्रीन वर मनोरंजन करून मागे ढकला एवढेच काय ते ध्येय आणि उदिष्ट सभोवताली दिसून येत आहे. तर मग स्व:चा शोध कसा लागणार आणि स्व:चा शोध लागणार नाही तर जीवन प्रवाही कसे होणार.  जीवनाचा प्रवाह थांबला की ते गढूळ होणार आणि त्यातू