Posts

Showing posts from November, 2023

मोलकरीण स्त्रीच्या हस्ते रावसाहेब कसबेचा सत्कार

Image
मोलकरीण महिलेच्या हस्ते झाला विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे सरांचा सत्कार   प्रसिद्ध विचारवंत मा. प्रा. रावसाहेब कसबे यांचा काल नाशिक येथे ८० व्या वाढदिवसानिमित्त  कामिनाताई किसन खिल्लारे (माझी मोठी बहीण) हिच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला... त्यावेळी विचारपिठावर मा. कसबे सरांच्या पत्नी आणि मा. उत्तम कांबळे साहेब उपस्थित होते... ताई नाशिक येथे स्वतः धुनी-भांडी करण्याचं काम करते...तसच तिनं त्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना उभी केली... त्यामुळे तिला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी होण्याचा...आणि रावसाहेब कसबे सरांसारख्या व्यक्तीचा सन्मान करण्याचा बहुमान मिळाला...   ताई आणि जिजाजी तसे दोघेही अक्षरशत्रु...म्हणजे अशिक्षित आहेत... पण त्यांना शिक्षणाविषयी आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी खुप तळमळ... ही तळमळ मी प्राध्यापक झाल्यामुळे त्यांच्यात आली...माझं बारावीनंतरच शिक्षण ताईनं नाशिकला केलं...माझ्या जिजाजीना वाचता येत नाही.. पण पुस्तके विकत घेण्याची खूप आवड...मी एकदा त्यांना विचारलं... तुमच्या घरात कोणीच वाचत  नाही; मग पुस्तक का बर विकत घेता?... तेव्हा त्यांनी 

भीती जगात नाही, तर मनात आहे..

Image
  भिती जगात नाही, तर मनात आहे  दिवाळीच्या सुट्टीत गावी आलोय...सकाळी रोज फिरण्याची सवय असल्यानं... नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता फिरायला निघालो... हवेत छान गारठा दाटलेला... पुर्वेला लालबुंद सुर्य... अंगावरील घनदाट अंधार लोटत... स्वयम् प्रकाशी... सृष्टी उजाळण्यासाठी हळूहळू उगवत होता... मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात मी सुध्दा चालत होतो…रस्त्याच्या आजुबाजुला झालेला बदल न्याहाळत होतो…शेलुबाजार रोडवर चिखली गावाजवळ खुपचं बदल झालेला…दोन्ही बाजूला प्लॉटिंग लेआउट पडलेले…चिखली फाट्यावर एक भलं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेलं…त्याला लागूनच खारी-टोस्टची फॅक्टरी…सगळ्या गोष्टी नवशहरीकरणाच्या दिशेनं चाललेल्या…      आता सगळं उजाडलं होतं…सूर्याची कोवळी किरणे पसरू लागली…व्यायाम करण्यासाठी एका प्लॉटिंग लेआउट मध्ये मी प्रवेश केला…तेवढ्यात पाच सहा कुत्र्यांची झुंड माझ्या अंगावर धावली…मी आपला हातात मोबाईल धरून शांत थांबलेला…त्यात काळ्या रंगाचा कुत्रा…खूपच मस्तवाल…तब्येतीने गुबगुबीत…उंचपुरा अन् धाडधिपाड…बाकी तीन मात्र सामान्य प्रकृतीचे…जेव्हा मी जाग्यावर शांत उभा राहिलो…तेव्हा ते माझ्यापासून काही अंतरावर उभे राह