मानवी जीवन हे सर्वश्रेष्ट आहे. ते सर्वश्रेष्ट आहे, कारण ते तीनही काळावर आपली छाप सोडते. भूतकाळातून ते स्फूर्ती आणि प्रेरणा घेते, वर्तमान काळात ते कार्यक्षिल आणि कार्यमग्न राहून परस्पर सहकार्याच्या जोरावर विकास साधते, भविष्याबद्दल ते आशावादी राहून आपला आणि इतरांच्या जगण्याचा अर्थ शोधत राहते. मात्र असे दिसून येते अनेक लोक संपूर्ण मानवी जीवन व्यतीत करतात, मात्र ते स्व:ताला शोधत नाहीत आणि स्वतःला ओळखतही नाहीत. जसे मी कोण आहे ? माझे कर्तव्य काय आहे ? आणि मी काय करायला हवे? हे तीन प्रश्न तसे खूपच सूचक आहेत. जो पर्यंत मी कोण आहे? याचा शोध लागत नाही तो पर्यंत आपले जीवन म्हणजे शीड नसलेले भरकटलेले जहाज किंवा वावटळ मध्ये भरकटलेला कागदाचा तुकडा या प्रमाणे आहे. आज आपण पाहतो की अनेकांची अवस्था अगदी या प्रमाणे झाली आहे. ना खाण्याची भ्रांत, ना जगण्याची आस, आहे तो दिवस मोबाइलच्या स्क्रीन वर मनोरंजन करून मागे ढकला एवढेच काय ते ध्येय आणि उदिष्ट सभोवताली दिसून येत आहे. तर मग स्व:चा शोध कसा लागणार आणि स्व:चा शोध लागणार नाही तर जीवन प्रवाही कसे होणार. जीवनाचा प्रवाह थांबल...
Posts
Showing posts from January, 2024