
सकारात्मक गुण लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. जेव्हा कोणीतरी हसऱ्या चेहऱ्याची, उदार दयाळू , अभ्यासू, गोड आवाजात बोलणारी आणि अतिशय विनम्र व्यक्ती दिसल्यास वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते. लोभस व्यक्तिमत्व आपणास भारावून टाकते. वैयक्तिक सकारात्मक गुण असंख्य सांगता येतील. उदा . दयाळू, कोमल, विचाराने ठाम, कठोर परिश्रम, विश्वासु, प्रामाणिक, जबाबदार, व्यवहारीक, तंदुरुस्त, सर्जनशील, अष्टपैलू आणि संवेदनशील असे अनेक सकारात्मक गुण सापडतील. यादी करावयाची झाल्यास खूप मोठी यादी निर्माण होईल. आता आपण काही महत्वपूर्ण सकारात्मक गुणांची चर्चा करणार आहोत. काही महत्वाचे सकारात्मक गुण : १) कृतज्ञता : माणसाला जीवनात अनेक लोकांची मदत मिळालेली असते. आपल्या पूर्वजांनी बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे आपले जीवन फार व्यवस्थित आणि सुसह्य झालेलं असतं . आपल्या कर्तृत्वाच्या उड्या त्यांच्या पूर्वकर्मांवर अवलंबून असतात. अर्थात याची जाणिव आपल्याला असायला हवी. आज मी जो काही आहे, त्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत, त्यांच्यासाठी मी काही केलं पाहिजे,...