सकारात्मक गुण लोकांना त्यांच्याकडे  आकर्षित करतात. जेव्हा कोणीतरी हसऱ्या चेहऱ्याची, उदार दयाळू , अभ्यासू,  गोड आवाजात बोलणारी आणि अतिशय विनम्र व्यक्ती दिसल्यास वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते. लोभस व्यक्तिमत्व आपणास भारावून टाकते.
वैयक्तिक सकारात्मक गुण असंख्य सांगता येतील. उदा . दयाळू, कोमल, विचाराने ठाम, कठोर परिश्रम, विश्वासु, प्रामाणिक, जबाबदार, व्यवहारीक, तंदुरुस्त, सर्जनशील, अष्टपैलू आणि संवेदनशील असे अनेक सकारात्मक गुण सापडतील. यादी करावयाची झाल्यास खूप मोठी यादी निर्माण होईल. आता आपण काही महत्वपूर्ण सकारात्मक गुणांची चर्चा करणार आहोत. 

काही महत्वाचे सकारात्मक गुण :

१) कृतज्ञता: माणसाला जीवनात अनेक लोकांची मदत मिळालेली असते. आपल्या पूर्वजांनी बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे आपले जीवन फार व्यवस्थित आणि सुसह्य झालेलं असतं . आपल्या कर्तृत्वाच्या उड्या त्यांच्या पूर्वकर्मांवर अवलंबून असतात. अर्थात याची जाणिव आपल्याला असायला हवी. आज मी जो काही आहे, त्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत, त्यांच्यासाठी मी काही केलं पाहिजे, हिच ती जाणिव म्हणजे कृतज्ञता होय. साधं जेवणाचं उदाहरण जरी घेतलं तरी लक्षात येईल की, जेवणाला कोणाकोणाचे हात लागले. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, दुकानदार, हमाल, निवडणारी बाई, गिरणीवाला, स्वयंपाकी बाई, ताटात जेवण वाढणारी आई नंतर आपण असतो. थोडक्यात आजचं आपलं आनंदी जीवन हे नुसतं आपलं एकट्याचं नाही. त्यामागे असंख्य लोक आहेत. मुलाला आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना कसं विसरता येईल? शिक्षकांना कसं विसरता येईल? ज्यांनी आपणास वेळोवेळी मदत केली अशा हितचिंतकांना, मित्रांना, नातेवाईकांना  विसरून विजयाचे पेढे कसे वाटू शकतो ?  लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे शरीर-मन किंवा एक जीव म्हणून जरी आपण स्वतंत्र असलो, तरी एक माणूस म्हणून स्वतंत्र नाहीत. आपल्यातलं माणूसपण वगळूनच स्वार्थी प्रवृत्तीचं समर्थन केलं जाऊ शकतं. म्हणून आपण ह्या सर्व लोकांचं, निसर्गाचं, समाजाचं कृतज्ञ असलं पाहिजे. अन्यथा आपल्यातलं माणूसपण संपण्याचा धोका असतो. 


कृतज्ञता म्हणजे नुसते धन्यवादाचे पोकळ शब्द नव्हेत, तर कृतज्ञता म्हणजे माणसाच्या मनातली भलेपणाची जाणिव आहे. कुणीतरी एखाद्या गरीब, बेवारस मुलाला सांभाळत, लहानाचं मोठं करतं, चांगलं शिक्षण देतं, गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळतं, अशा मुलाचं त्या लोकांच्या प्रति जबाबदारीन वागणं  म्हणजे कृतज्ञता आहे.  कृतज्ञता धन्यवादासोबत नातं निर्माण करायला शिकवीते, अस्तित्वात असलेलं  नातं आणखी घट्ट करायला शिकविते. ज्यांचे आपल्यावर आशिर्वाद आहेत अशांच्या प्रति विनम्र होऊन उतराई होण्यास भाग पाडते. कृतज्ञता मानसिक ताणाचं ओझं वाढवित नाही जबाबदारीचा आनंद वाढविते.  हाच आनंद कृतज्ञ व्यक्ती आणि  आशिर्वाद देणारी व्यक्ती अशा दोघांच्या चेहऱ्यावर आनंदचं हसू बहरण्यास भाग पाडतं. दोघांचं मानसिक आरोग्य उत्तम राहतं आणि जीवनात आनंदाचा  वर्षाव होतो. 
     कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माणसानं नेहमी जागरूक असलं पाहिजे. तेव्हाच  सुविचार 

       

Comments

Popular posts from this blog

FYBA SEM II

मानसशास्त्राची ओळख

भीती जगात नाही, तर मनात आहे..