लॉकडाऊन मधील गरीबांची पायपीट
लॉकडाऊन मधील गरीबांची पायपीट आपला गावसोडून शहराकडे जाणारी माणसं आज खूप पश्चाताप करू लागली. कोणी शेतीवाडीत काम मिळत नव्हतं म्हणून शहरात गेली. गावातल्या मजुरीपेक्षा शहरात चार पैसा जास्त मिळतो म्हणून काहीनी आपली घरं सोडली. काहीनी सावकाराचं बक्कळ कर्ज फेडायचं म्हणून गावातली घरं ओस पाडली. काहीजण तर " शहरात हाताला मिळेल ती मोलमजुरी करू, पण गावातली सालं-महिने भरणं आता नको रं बाबा" असं म्हणत शहरवासी झाली. गावातल्या शाळेत मुख्याध्यापक असेल तर वर्गशिक्षक नसतो. मुख्याध्यापक सुट्टीवर गेला की वर्गशिक्षक मोबाईलमध्ये गुंग. शिक्षणाच्या नावानं नुसती बोंबाबोंब. शहरात पोरांना चांगलं शिक्षण तरी मिळेल, म्हणून काहीनी गाव पोरका केला. अर्थात गावात देखील काही शिक्षक अजूनही छान काम करीत आहेत. स्वतःमधला शिक्षक त्यांनी मोठ्या मेहनतीनं जपला आहे. असेच सर्व शिक्षक काम करू लागली, तर आज सुद्धा खाजगी शाळांपेक्षा सरकारी शाळांना चांगले दिवस येतील. गमावलेला विश्वास परत मिळविता येईल. पण आज जे जे सरकारी आहे, ते ते उपयोगाचं नाही, असा समज जवळपास सगळीकडे...