Posts

Showing posts from August, 2023

व्यक्तिमत्वाला आकार देणारे घटक

  २. १. व्यक्तिमत्वाला आकार देणारे घटक (Factors of shaping Personality) : आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे किंवा व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत योगदान देणारे अनेक घटक आहेत. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण करून ते आपण सहज समजू शकतो. ते घटक खालीलप्रमाणे सांगता येतात.  १ . अनुवांशिक देणगी (Genetic endowment) : आपल्या वर्तनाची काही वैशिष्ट्ये हे अनुवांशिक आहेत. जी आपल्याला पूर्वजाकडून वारशाने मिळतात. शारीरिक उंची, रंग, रूपसौंदर्य, सडपातळपणा, निपुणता, बौद्धिक क्षमता, शिकण्याची क्षमता, तार्किक सामर्थ्य, आवडी-निवडी इत्यादी काही वैशिष्ट्ये पूर्वीच्या पिढीकडून  वारशाने मिळतात. शारीरिक किंवा मानसिक गुण वैशिष्ट्यांचे अनुवांशिकरित्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणे म्हणजे अनुवांशिकता आहे. जशी खाण तशी माती ही म्हण अनुवांशिकता सूचित करते. तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर ‘तुमच्या घरात पूर्वी कोणाला हा आजार झाला होता का?’ असा प्रश्न विचारुन हा आजार अनुवांशिक आहे का? याचा शोध डॉक्टर घेतात. ही अनुवांशिक देणगी एका पिढीकडून-दुसऱ्या पिढीकडे ‘जीन’ ( genes ) च्या माध्यमातून संक्रमित केल...