व्यक्तिमत्वाला आकार देणारे घटक

 


२. १. व्यक्तिमत्वाला आकार देणारे घटक (Factors of shaping Personality): आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे किंवा व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत योगदान देणारे अनेक घटक आहेत. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण करून ते आपण सहज समजू शकतो. ते घटक खालीलप्रमाणे सांगता येतात. 

. अनुवांशिक देणगी (Genetic endowment):

आपल्या वर्तनाची काही वैशिष्ट्ये हे अनुवांशिक आहेत. जी आपल्याला पूर्वजाकडून वारशाने मिळतात. शारीरिक उंची, रंग, रूपसौंदर्य, सडपातळपणा, निपुणता, बौद्धिक क्षमता, शिकण्याची क्षमता, तार्किक सामर्थ्य, आवडी-निवडी इत्यादी काही वैशिष्ट्ये पूर्वीच्या पिढीकडून  वारशाने मिळतात.


शारीरिक किंवा मानसिक गुण वैशिष्ट्यांचे अनुवांशिकरित्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणे म्हणजे अनुवांशिकता आहे.


जशी खाण तशी माती ही म्हण अनुवांशिकता सूचित करते. तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर ‘तुमच्या घरात पूर्वी कोणाला हा आजार झाला होता का?’ असा प्रश्न विचारुन हा आजार अनुवांशिक आहे का? याचा शोध डॉक्टर घेतात.


ही अनुवांशिक देणगी एका पिढीकडून-दुसऱ्या पिढीकडे ‘जीन’ (genes) च्या माध्यमातून संक्रमित केली जाते. या सर्वांचा आपल्या वर्तणुकीच्या पद्धतींवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो.


२. अंतःस्रावी ग्रंथी (Endocrine Glands):

ग्रंथी आपल्या शरीराच्या अंतर्गत वातावरणाचे नियमन करण्यास मदत करतात. अंतःस्रावी ग्रंथी (endocrine glands) आणि बहिःस्रावी ग्रंथी (exocrine glands) अशा दोन प्रकारच्या ग्रंथी आहेत.


अंतःस्रावी ग्रंथीचे संप्रेरक किंवा हार्मोन्स थेट रक्तप्रवाहात स्त्रवतात तर एक्सोक्राइन ग्रंथीचे हार्मोन्स नलिकांद्वारे स्त्रवतात.


मुख्य अंतःस्रावी ग्रंथी (i) पिट्यूटरी (Pituitary)  (ii) अधिवृक्क (Adrenal) (iii) पाइनल (Pineal) आणि (iv) थायरॉईड (Thyroid) ग्रंथी ह्या आहेत. 


३. कौटुंबिक पार्श्वभूमी (Family background):

कौटुंबिक वातावरण मुलांची ओळख तयार करण्यात मोठी भूमिका बजावते. कौटुंबिक मूल्ये, रचना,वातावरण आणि नातेसंबंध हे महत्त्वाचे पैलू आहेत, जे मुलाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात.


कौटुंबिक सदस्य ज्या प्रकारे एकमेकांशी संबंध ठेवतात आणि एक सामाजिक गट म्हणून एकत्र काम करतात, त्यामधून मुलांचा आत्मसन्मान, सामाजिकीकरण आणि सांस्कृतिक ओळख बनवू शकतात.


पालक आणि मित्र सामान्यतः एखाद्या मुलाचे वर्तन आणि विचार (mind) तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असतात.


पालकांचा व्यवसाय लहान मुलाच्या विकासावर खुप परिणाम करतो. कुटुंबातील सदस्य जशी एकमेकांची काळजी घेतात, प्रेम करतात तशाच प्रकारचं वर्तन मुलं करू लागतात. कारण ते मोठ्यांचं अनुकरण करीत असतात. 


४. मित्र आणि शेजारी (Friends & Neighbourhood)

वर्षानुवर्षे जे आपले सर्वोत्तम मित्र असतात ते आपल्या व्यक्तिमत्त्व विकासावर खूप प्रभाव पाडतात. मग आपल्याला त्याची जाणीव असो वा नसो. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक परिस्थितींमध्ये आपण त्यांची भाषा किंवा शब्दांची निवड वापरत असतो.


कपड्यांच्या किंवा फॅशनच्या निवडीमध्ये, खाण्यात सवयीमध्ये, आपल्या जीवनातील दृष्टिकोनात, आपल्या जीवनशैलीवर  आपल्या मित्रांचा आणि शेजाऱ्यांच्चा प्रभाव पडतो. 


तुमचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात तुमचे मित्र प्रत्यक्ष भूमिका बजावत नाहीत; पण अप्रत्यक्षपणे ते तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.


५. शाळा (School)

जुन्या काळाप्रमाणे प्रमाणे आता शाळा ही केवळ शिक्षणाची संस्था राहिलेली नाही. शाळा ही ज्ञान देण्याचे ठिकाण आहे. शाळा आजकाल मुलाच्या जीवनातील शिक्षण आणि गैर-शैक्षणिक पैलूंची काळजी घेतात. मुलांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून सुधारण्यासाठी शाळाही मदत करतात. 


शाळेतील वर्गात सामान्यतः लाजाळू, भित्री, हुशार, हळू शिकणारे आणि जलद शिकणारे विद्यार्थी असतात. म्हणून शिक्षकाने प्रत्येक मुलाच्या वेगानुसार आणि त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिकवणे आवश्यक असते.


जी मुले शिकण्यात मागे राहतात ते व्यक्तीमत्व विकासात मागे पडतात. शिक्षकांनी प्रत्येक मुलाचे गुणधर्म समजून घेणे आवश्यक आहे.


लहानपणापासूनचा व्यक्तिमत्त्व विकास मुलांमध्ये भावी जीवनातील सकारात्मक वर्तनाचा विकास सुनिश्चित करतो. म्हणुन शाळेची भूमिका खुप महत्वपूर्ण आहे.


शाळांनी मुलांची शैक्षणिक गुणवत्ता, सकारात्मक चारित्र्य निर्मिती, सामाजिक कौशल्यांचा विकास आणि शिस्त ह्या गोष्टी विकसित करण्यावर भर देणे आवश्यक आहे. 


६. समाज (Society):

जीवशास्त्रीय आणि बोधात्मक घटक व्यक्तिमत्व

निर्मितीवर प्रभाव टाकू शकतात. परंतु समाज वर्तणूक

मानके स्थापित करून, सामाजिक मूल्ये स्थापित करून,

परस्परसंवादाचे योग्य मार्ग निर्धारित करून आणि समाजाला

कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक भूमिका निर्धारित

करून व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेत घुसखोरी करतात.

त्याला समजिकिकरण असं म्हणतात. समाजीकरण ही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याची प्रक्रिया आहे. हे व्यक्तीला समाजातील नियम आणि मूल्यांशी सुसंगत होण्यास मदत करते. अनुकरण, सूचना, ओळख आणि भाषा हे समाजीकरणाच्या प्रक्रियेत मदत करणारे घटक आहेत. 


७. संस्कृती (Culture)

लोकांचा समूह ज्या पद्धतीने जीवन जगतो त्याला त्यांची संस्कृती म्हणतात. 


संस्कृती ही मोठ्या लोकसमुहामध्ये समाविष्ट असलेल्या परस्परसंबंधित ज्ञान प्रणालींचा संच आहे. 


यामध्ये गटातील सदस्यांनी स्वीकारलेले आचरण, विश्वास, मूल्ये आणि चिन्हे यांचा समावेश होतो.


संवाद आणि अनुकरणाद्वारे संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते. सांस्कृतिक घटक हे पर्यावरणीय घटकांपैकी एक घतक आहे.


सर्व संस्कृतींमध्ये काही निकष असतात तसेच वर्तनविषयक अपेक्षा देखील असतात. हे सांस्कृतिक निकष एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू निर्माण करण्यात मार्गदर्शन करू शकतात. 


८. तंत्रज्ञान (Techonology):

तंत्रज्ञान केवळ लोकांचा जगाशी संवाद साधण्याचा मार्ग बदलत नाही, तर मानवी वर्तन आणि मेंदूचा अभ्यास करण्याचा मार्ग देखील बदलत आहे.


एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर तंत्रज्ञानाच्या वापरावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, कमी आत्मसन्मान, आवेग, संवेदना शोधणारे आणि अत्यंत बहिर्मुख किंवा अंतर्मुख व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकांमध्ये 'तंत्रज्ञान अवलंबित्व' विकसित होण्याची अधिक शक्यता असते. लोकांच्या फोनचा वापर त्यांची सामाजिकता प्रतिबिंबित करू शकतो.


९. प्रसार माध्यमे (Mass Media):प्रसारमाध्यमांचा वापर करण्याच्या अत्यधिक

व्यसनामुळे जगाशी संबंध तोडणे, अहंकार

निर्माण होणे, झोपेची कमतरता जाणवणे,

खराब शैक्षणिक कार्यप्रदर्शन, असुरक्षित

वाटणे, समाजविरोधी वर्तन करणे,

एकाकीपणा, इ. ज्यामुळे व्यक्तीच्या

व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर विपरित

परिणाम होतो.






Comments

Popular posts from this blog

OE- Psychology of Happiness

FYBA SEM II

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती