Posts

Showing posts from February, 2024

FYBA SEM II

प्रकरण १ ले  बोधात्मक प्रक्रिया   आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात त्याची जाणीव आपल्याला वेदनेंद्रियामार्फत होत असते. वेदनेंद्रियांनाच ज्ञाननेंद्रिये किंवा पंचेंद्रिये देखील म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही मानवाची पाच वेदनेंद्रिये आहेत. आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. त्या सर्व घटनांची जाणिव आपल्याला आपल्या वेदनेंद्रियांमार्फत होते. परंतु त्या सर्वच घटनांचा आपल्याला ‘बोध’ (अर्थ समजणे) होत नाही. कारण आपल्या वेदन इंद्रियांची क्षमता मर्यादित असते. अतिसूक्ष्म धूलिकण आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत, अत्यल्प वास आपल्या नाकाला जाणवत नाही, अतिसूक्ष्म आवाज आपल्याला कानाने ऐकू येत नाही. आपल्या सभोवतालच्या परिसरातील गोष्टींचा आपल्याला जो ‘अर्थबोध’ होतो, त्या मानसिक प्रक्रियेला संवेदन किंवा बोधन म्हणतात. अगोदर माणसाला वेदनेंद्रियमार्फत परिसरातील उद्दीपकांची जाणीव होते व त्यानंतर संवेदन घडते. उद्दीपकांची नुसती जाणीव होणे म्हणजे वेदन होय तर उद्दीपकाचे अर्थबोधन होणे म्हणजे संवेदन. उदा. नुसते व्याख्यान ऐकणे म्हणजे वेदन आहे; तर व्याख्यानाचा अर्थ समजणे म्हणजे संवेदन आहे. यावरुन वेदन