मला समजलेले शाहू महाराज
मला समजलेले राजर्षी शाहू महाराज भारतीय इतिहासात अनेक राजे झाले. त्यांच्या कहाण्या इतिहासाच्या पानापानावर वाचायला मिळतात. राजा म्हणजे हुकुमशहा. 'राजा बोले दल हाले' उगीच म्हटलं जात नाही. पण काही राजे त्यांच्या कार्य कर्तुत्वानं भारतीय इतिहासात अजरामर सुद्धा झाले. असाच एक राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड हॅरीस यांच्या उपस्थितीत २ एप्रिल १८९४ रोजी महाराजांनी कोल्हापूर संस्थांची सूत्रे हाती घेतली. तेव्हा महाराजांचं वय अवघं वीस वर्ष होतं. शाहू महाराजांनी राज्यारोहनानंतर लगेच कोल्हापूर संस्थांचा दौरा केला. जेव्हा संस्थानातून छत्रपतीची स्वारी निघायची तेव्हा लागणारा खानापाणी त्या त्या गावातील गावकऱ्यांकडून विकत घेतल्या जायचा. पण त्याचा मोबदला मात्र त्यांना दिला जात नसे. मामलेदार, फौजदार, शिपाई, गावचा पाटील यांच्यातच तो गायप होत असे. रयतेवर होणारा जुलूम महाराजांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला. तेव्हा स्वतःच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी पहिला जाहीरनामा काढला. खेड्या गावातल्या रयतेमध्ये हर्षाची लाट आली. शाहू महाराजांनी आपल्या अनोख्या कार्य शैलीनं लोकांचा विश्...