स्व-संकल्पना (Self Concept)
'स्व-संकल्पना' (Self Concept) ही एक संज्ञा आहे; जी आपण स्वतःबद्दल बाळगत असलेले विश्वास,अभिरुची,कौशल्ये आणि प्रवृत्तीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते. यात आपले वर्तन आणि क्षमतांपासून ते अद्वितीय वैशिष्ट्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. आमची स्व-संकल्पना निश्चित नाही परंतु आपण जसे शिकतो, वाढतो आणि नवनवीन अनुभव घेतो तसतसी काळानुसार बदलू शकते. यावरून आपल्या हे लक्षात येते; स्व संकल्पना हि जन्मजात नाही; तर ती जन्मानंतरच्या अनुभवातून विकसित होते.