FYBA SEM-II PSY-121 Cognitive Psychology

सत्र दुसरे प्रकरण १ ले अवधान आणि संवेदन (Attention &Perception ) आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात त्याची जाणीव आपल्याला वेदनेंद्रियामार्फत होत असते. वेदनेंद्रियांनाच ज्ञाननेंद्रिये किंवा पंचेंद्रिये देखील म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही मानवाची पाच वेदनेंद्रिये आहेत. आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. त्या सर्व घटनांची जाणिव आपल्याला आपल्या वेदनेंद्रियांमार्फत होते. परंतु त्या सर्वच घटनांचा आपल्याला ‘बोध’ ( अर्थ समजत) होत नाही. कारण आपल्या वेदन इंद्रियांची क्षमता मर्यादित असते. अतिसूक्ष्म धूलिकण आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत, अत्यल्प वास आपल्या नाकाला जाणवत नाही, अतिसूक्ष्म आवाज आपल्याला कानाने ऐकू येत नाही. आपल्या सभोवतालच्या परिसरातील गोष्टींचा आपल्याला जो ‘अर्थबोध’ होतो, त्या मानसिक प्रक्रियेला संवेदन किंवा बोधन म्हणतात . अगोदर माणसाला वेदनेंद्रियांमार्फत परिसरातील उद्दीपकांची जाणीव होते व त्यानंतर संवेदन घडते. लक्ष देणे हि एक जटिल बोधात्मक कार्य आहे, जे मानवी वर्तनासाठी अत्यावश्यक आहे. ही एक अनेक महत्त्वाच्या मानसिक प्रक्रियांपै...