सकारात्मक भावनांची ताकत
सकारात्मक
भावनांची ताकत
डॉ. एन. एस. डोंगरे
मानसशास्त्र विभागप्रमुख, एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे
भावना या शब्दाची व्याख्या करणे तसे कठीण काम आहे. तथापि, भावनांचा संबंध माणसाच्या अनुभवांशी आहे. आपण लोक बहुदा मनःस्थिती, मनोभाव यांचा जो नेहमी अनुभव घेतो, त्याला मानसशास्त्रज्ञ भावना म्हणतात. बऱ्याच वर्षांपासून मानसशास्त्राने उदासीनता, राग, व्देष, मत्सर, तणाव, भीती आणि चिंता यासारख्या नकारात्मक भावनांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा संबंध नेहमीच आपल्या मानसिक आजारांशी राहिलेला आहे. असे असले तरी सकारात्मक भावना काही कमी आकर्षक नाहीत, परंतु त्यांचे अस्तित्व अगदी साधे सोपे असल्यामुळे त्यांच्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. आपण बहुदा असा विचार करतो की, सकारात्मक भावना ह्या नैसर्गिक व साध्या असतात, त्या नकारात्मक भावना सारखा दीर्घकाळ प्रभाव पाडू शकत नाहीत. माणसाला विचारांच्या गर्तेत ओढत नाहीत. मानसशास्त्रातील संशोधनाने वरील गोष्टी जरी दर्शविल्या नसल्या, तरीही सकारात्मक भावनांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा उशीरच झाला आहे. हे तुलनेने फार उशिरा मानसशास्त्रज्ञांना समजले असावे की, सकारात्मक भावना ह्या स्वभावतः अधिक मौल्यवान आहेत. उशिरा का होईना पण त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे असलेली व्यक्ती म्हणजे बार्बरा फ्रेड्रिकसन ह्या आहेत. फ्रेड्रिकसन यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीत सकारात्मक भावनांचे फायदे समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. नकारात्मक भावना उदा. चिंता किंवा क्रोध ह्या विशिष्ट कार्य पद्धतीशी संबंधित आहेत, ज्या लढा किंवा पळा ह्या गोष्टींमध्ये योगदान देतात. याशिवाय, नकारात्मक भावना माणसाची कार्यप्रदर्शन कमकुवत करतात, सत्य वर्तन करण्याची प्रवृत्ती संकुचित करतात, धोक्यांपासून पासून पळ काढण्यास भाग पाडतात. तसेच, आपण एका सुंदर सूर्यास्ताची प्रशंसा करू शकणार नाही, इतरांची माफी मागू शकणार नाही इतके भावनिकदृट्या माणसाला कंजूस बनवितात.
दुसरीकडे सकारात्मक भावना विशिष्ट कृतींशी संबंधित नसतात, तर मग त्यांच्यात चांगले किंवा सकारात्मक असे काय आहे? आनंदी किंवा आनंददायक वाटणारा मुद्दा काय आहे? बार्बरा फ्रेड्रिकसन यांनी विकसित केलेला सकारात्मक भावनांचा 'विस्तृत आणि निर्मित' सिद्धांत, असे दर्शवितो की सकारात्मक भावनानुभव माणसाची वैयक्तिक वाढ आणि विकास यावर दीर्घकाळ प्रभाव पाडतो, ते पुढील प्रमाणे आहे :
(अ) सकारात्मक भावना माणसाच्या विचार-कृतीचे प्रदर्शन
वाढवतात: प्रथम, सकारात्मक भावना आपले लक्ष आणि विचार वाढवतात, याचा अर्थ
असा होतो की आपल्याकडे अधिक सकारात्मक विचार आणि त्यातील विविध प्रकार निर्माण होतात.
जेव्हा आपण आनंद किंवा मौज यासारख्या सकारात्मक
भावना अनुभवत असतो तेव्हा आपल्याला अधिक संधी पाहण्याची, इतरांसोबत नातेसंबंध ठेवण्याची,
खेळकरपणा करण्याची, अधिक लवचिक आणि मनमोकळेपणाने जगण्याची शक्यता निर्माण होण्याची
शक्यता अधिक असते.
(आ) सकारात्मक भावना नकारात्मक
भावनांना पूर्ववत करतात: सकारात्मक आणि नकारात्मक भावना एकाच वेळी अनुभवणे कठीण आहे; तथापि सकारात्मक भावनांनुभव नकारात्मक भावनांना त्यांच्या प्रभावामधून मुक्त करून पूर्ववत सकारात्मक करण्यास मदत करू शकतात. सौम्य आनंद आणि समाधान ह्या सकारात्मक भावना शारीरिक पातळीवरील तणावाचा अनुभव दूर करण्यास मदत करतात.
(इ) सकारात्मक
भावना माणसाची लवचिकता वाढवतात: मौज, आनंदी खेळणी, समाधान, उबदारपणा, जिवलग मैत्री,
प्रेम आणि स्नेह ह्या सर्व गोष्टी माणसाच्या स्वभावाची लवचिकता आणि समस्या सोडविण्याची क्षमता वाढवितात, तर नकारात्मक भावना त्याच्या उलट
असून माणसाची क्षमता कमी करतात. सकारात्मक भावना समस्या-केंद्रित वर्तन वाढवून आणि पूर्वस्थिती वाढवू शकतात किंवा नकारात्मक भावनांना सकारात्मक अर्थाने कार्यात गुंतवू शकतात, ह्या सर्व गोष्टी त्रासदायक (अपघात, आजारपण,आर्थिक नुकसान,
प्रिय व्यक्तीचा वियोग) घटनेनंतर चेंडूसारखी तुरंत मुसंडी
मारण्यास भाग पाडतात.
(ई) सकारात्मक
भावना मानसिक प्रदर्शन तयार करतात: नकारात्मक भावनेचा केवळ एक क्षणिक प्रभाव असल्यामुळे,
सकारात्मक भावना महत्वपूर्ण शारीरिक, भौतिक, बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक संसाधने तयार
करण्यास मदत करतात. भावना अल्पकालीन असल्याने त्या निघून जातात तथापि ही संसाधने मात्र
टिकून राहतात. उदाहरणार्थ, खेळाशी संबंधित सकारात्मक भावना शारीरिक क्षमता तयार करू
लागतात; स्वत: ची निपुणता आणि मित्रांसह आनंददायक वेळ सामाजिक कौशल्य वाढवतात.
(उ) सकारात्मक
भावना विकासाचा आलेख उंचाविण्यासाठी कारणीभूत
ठरू शकतात: त्यापेक्षाही नकारात्मक भावना उदासीनतेचा आलेख उंचाविण्यासाठी
कारणीभूत होऊ शकतात, सकारात्मक भावना सुधारित भावनिक कल्याणासाठी आणि लोक स्वतःमध्ये
चांगले बदल करण्यासाठी व विकासात्मक आलेख उंचाविण्यासाठी कारणीभूत ठरतात.
विस्तृत आणि
निर्मित सिद्धांत आपल्याला सकारात्मक भावनांवर विचार करण्यास उद्युक्त करतो. चॉकलेट
आइस्क्रीम खाणे, बिअर पिणे, ड्रग घेणे किंवा शरीराची मालिश करणे यासारख्या तात्पुरत्या सुखद
भावनांपासून सकारात्मक भावनांना वेगळे केले जाते. त्यापासून निर्माण होणाऱ्या संवेदना सकारात्मक भावनांप्रमाणे नाहीत, कारण ते टिकाऊ वैयक्तिक संसाधनांच्या संचयनास कारणीभूत ठरत नाहीत. सकारात्मक
भावना आपण कशा वाढवू शकतो ? स्नायूसिथिलीकरण,
योग अभ्यास , प्रतिमा अभ्यास आणि विपश्यना ध्यान साधना यांच्या माध्यमातून आपण सकारात्मक
भावना वाढवू शकतो, त्याचे इतर अनेक फायदे देखील आहेत. स्वतःला आपण एक विशिष्ट सकारात्मक
भावना अनुभवू शकत नाही आणि कोणीही आपल्यामध्ये ती
उत्पन्न करू शकत नाही. आनंददायी क्रियाप्रक्रियांमध्ये गुंतले तरी सकारात्मक
भावनांची हमी देता येत नाही, कारण ते आपण कोणत्याही गोष्टीचा अर्थबोध कसा करतो त्यावर ते अवलंबून असते. आपण क्रियाप्रतिक्रियांमध्ये
सकारात्मक अर्थ शोधून किंवा सकारात्मक मूल्य शोधून दैनंदिन क्रियाप्रक्रियांमध्ये सकारात्मक अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. सकारात्मक भावना
नक्कीच चांगल्याप्रकारे खडकाळ (त्रासदायक प्रसंगी ) मार्गावर आपल्याला मदत करू शकतात,
परंतु त्यांच्यामुळे नकारात्मक भावना अप्रासंगिक
किंवा बिनमहत्वाच्या होत नाहीत. नकारात्मक भावनांमुळे आपणास कदाचित खूप चांगले वाटत
नाही, परंतु तरीही ते खूप सकारात्मक प्रभाव आणू शकतात. नकारात्मक भावनांच्या संरक्षणार्थ
खालील प्रस्ताव मांडले जातात:
१. नकारात्मक
भावना माणसाच्या व्यक्तिमत्वात मूलभूत बदल घडविण्यास मदत करू शकतात. भावनांचे अग्रगण्य तज्ञ रिचर्ड लाजारस
लिहितात: 'प्रौढ व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात मोठे स्थिर बदल होण्यासाठी जीवन आघात, वैयक्तिक संकट किंवा धार्मिक रूपांतरण' आवश्यक आहे.
२. नकारात्मक
भावना आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वभावाच्या गहाण खोलीत उतरवू शकतात आणि
गहन स्वभावाशी आपला नव्याने संपर्क
साधून देऊ शकतात.
३. अखेरीस, नकारात्मक
प्रभावाचा अनुभव घेताना आणि त्यास तोंड देताना
नम्रता, नैतिक विचार, काळजी आणि सहानुभूती ह्यासारखे सकारात्मक सामाजिक (गुण) परिणाम माणसात उदयास येऊ शकतात.
४. नकारात्मक
भावना आपल्या स्वतःविषयीचे ज्ञान आणि जगाविषयीचे ज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध करून देऊ
शकतात. शहाणपण हा जीवनाचा एक अविभाज्य भाग असून ते दुःख आणि हानि अनुभवल्यामुळे
माणसात निर्माण होते.
काही विद्वानांच्या
मते, सर्व भावनांना सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन पिशव्यांमध्ये ठेवणे ही केवळ एक ज्ञानी चाल आहे. पाश्चिमात्य समाजात सामान्यतः सकारात्मक भावनाविषयी
अभिमान बाळगला जातो. प्रेम
हि पहिली भावना आहे, जी माणसाच्या मनात सकारात्मकता निर्माण करते, पण तेव्हा ती अनुत्तरित
असते. कोणीतरी दात काढून हसणे आणि स्मितहास्य ह्या सकारात्मक भावना मानला जाऊ शकतात?
भावना समजून घेण्याचा प्रयत्न करताना त्या कोणत्या परिस्थितीत किंवा संदर्भात वापरल्या आहेत, त्यावरून त्यांची नकारात्मक किंवा सकारात्मकता निश्चित होते.
मानसशास्त्र विभागप्रमुख, एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे
This comment has been removed by the author.
ReplyDeleteNice & Informative Article...
ReplyDeleteसर आपली प्रतिक्रिया प्रेणदायी धन्यवाद
DeleteNice..
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteVery informative and useful article
ReplyDeleteधन्यवाद
Deleteलिहिते रहा
ReplyDeleteसर आपके यह विचार हमे जिवन जीना सिकाते है।
ReplyDeleteधन्यवाद...मै आपका बहुत आभारी हूं
Deleteसर आपके यह विचार हमे जिवन जीना सिकाते है।
ReplyDeleteधन्यवाद
Delete