Posts

Showing posts from 2025
 प्रश्न १ ला. लहान मुलांना मोबाईलचे व्यसन का लागते ? उत्तर- लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागण्याची अनेक कारणे आहेत:   अगदी लहान बालक रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी पालक खेळण्याच्या ठिकाणी मोबाईलचा उपयोग करीत असतात. मुले देखील मोबाईल मधील फोटो, व्हिडीओ, कार्टून बघून शांत होतात. त्यातून लहान मुलांना मोबाईलची ओळख होते आणि हळूहळू मुले मोबाईल हाताळायला सुरुवात करतात.  लहान मुले मोठ्या लोकांच्या वागण्या-बोलण्याचे अनुकरण करीत असतात. मोठे लोक जसे बोलतात तसेच ते बोलतात, जी भाषा घरातील किंवा आजूबाजूचे लोक बोलतात तीच भाषा ते शिकतात. लहान मुले सुद्धा मोठया लोकांच्या अनुकरणातूनच मोबाईलकडे वळतात. हळूहळू मोबाईल हाताळायला शिकतात.  जेव्हा बालक मोबाईल हाताळतो आणि कुण्या नातेवाईकांचा आलेला फोन स्विकारतो तेव्हा पालकांकडून त्याचे मोठे कौतुक केले जाते. अशा प्रकारचे कौतुक बालकांसाठी एक प्रकारचे बक्षीस किंवा रिवार्ड असते. असेच मोबाईल मधील रिल्स, व्हिडीओ, फोटो यातून   निर्माण होणारी उत्तेजना मेंदूतील डोपामाइन रिवॉर्ड सिस्टम सक्रिय करते. त्याच गोष्टी पुन्हा करून, पुन्हा बघून...