प्रश्न १ ला. लहान मुलांना मोबाईलचे व्यसन का लागते ?
उत्तर-लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागण्याची अनेक कारणे आहेत:
- अगदी लहान बालक रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी पालक खेळण्याच्या ठिकाणी मोबाईलचा उपयोग करीत असतात. मुले देखील मोबाईल मधील फोटो, व्हिडीओ, कार्टून बघून शांत होतात. त्यातून लहान मुलांना मोबाईलची ओळख होते आणि हळूहळू मुले मोबाईल हाताळायला सुरुवात करतात.
- लहान मुले मोठ्या लोकांच्या वागण्या-बोलण्याचे अनुकरण करीत असतात. मोठे लोक जसे बोलतात तसेच ते बोलतात, जी भाषा घरातील किंवा आजूबाजूचे लोक बोलतात तीच भाषा ते शिकतात. लहान मुले सुद्धा मोठया लोकांच्या अनुकरणातूनच मोबाईलकडे वळतात. हळूहळू मोबाईल हाताळायला शिकतात.
- जेव्हा बालक मोबाईल हाताळतो आणि कुण्या नातेवाईकांचा आलेला फोन स्विकारतो तेव्हा पालकांकडून त्याचे मोठे कौतुक केले जाते. अशा प्रकारचे कौतुक बालकांसाठी एक प्रकारचे बक्षीस किंवा रिवार्ड असते. असेच मोबाईल मधील रिल्स, व्हिडीओ, फोटो यातून निर्माण होणारी उत्तेजना मेंदूतील डोपामाइन रिवॉर्ड सिस्टम सक्रिय करते. त्याच गोष्टी पुन्हा करून, पुन्हा बघून आनंद मिळतो आणि मुले मोबाईलच्या आहारी कधी जातात ते त्यांना स्वतःलाही समजत नाही.
- घरातील दोन भावंडे एकमेकांत भांडतात जेव्हा जास्त वाद व्हायला नको म्हणून सुद्धा पालक मुलांना फोन वापरण्याची परवानगी देतात. दोन्ही मुले शांत आणि घर देखील शांत होते.
- कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाच्या नावाने मुलांना मोबाईलवर जास्त वेळ घालवाची मुभा मिळाली. तेव्हा पासुन मुले अभ्यासानिमित्ताने झूम मिटिंग, गुगल मीट, गुगल, युट्युबचा मोठया प्रमाणात उपयोग करू लागली. अभ्यासाचे बघतात-बघतात कधी ते सोशल मिडीयावर रममाण होतात, ए त्यांना देखील कळत नाही.
उत्तर;-
- आजच्या काळाच्या गरजांचा विचार करता मुलांना मोबाईलचा वापर अजिबात करू न देणं शक्य नाही. आपण पालक म्हणून मुलांच्या सहमतीनं काही नियम घालून देऊ शकतो. अशा प्रकारचे नियम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहेत.
- हे नियम घालून देताना पालकांनी मुलांच्या वयाचा विचार केला पाहिजे. लहान मुलांसाठी थोडे कठोर तर मोठया मुलांसाठी हे नियम थोडे शिथिल करायला हवेत.
- लहान मुलांच्या दिवसभराच्या वेळापत्रकात जसा होमवर्कला, मित्रांसोबत खेळायला, टि.व्ही. बघायला, विश्रांतीला, मुलांचे छंद जोपासायला पालक देतात तसा एखादा तास मोबाईल द्यायला हवा.
- शिक्षणाशी निगडित असलेल्या गोष्टी मोबाईलवर पाहण्यासाठी 'स्क्रीन टाईम सेट' करायला हवा. त्यानंतर मोबाईल आपोआप लॉक झाला पाहिजे. अशी व्यवस्था मोबाईलमध्ये तज्ञांकडून पालकांनी करून घ्यायला हवी.
- मुलांना शारीरिक व्यायाम, ऑनलाईन डिजिटल जगापेक्षा प्रत्यक्ष जगातील वातावरण, खेळ, गप्पा करणं, विविध छंद जोपासणं हे पालकांनी पटवून दिलं पाहिजे.
- घरातील सगळ्या लोकाचे रात्री झोपण्याचं आणि सकाळी उठण्याचं वेळापत्रक सारखे असायला हवं. ते काही अपवाद वगळता सगळ्यांनी पाळायला हवं.
- तुमच्या घरातील काही रूम्स 'टेक फ्री झोन' करा. म्हणजे घरातील काही ठिकाणी मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप अजिबात वापरल्या जाणार नाही. उदा. डायनिगमध्ये फक्त जेवण करायला हवं, बेडरूम फक्त झोपण्यासाठीच वापरला जावा, तेथे कुणीही स्क्रीन वापरणार नाही याची काळजी घ्यावी.
- हल्ली असे बरेच अँप्स आले आहेत ते मुलांच्या स्क्रीन वापरांवर पालकांना नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
- 'अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स'ने लहान मुलांच्या स्क्रीनटाईम संबंधी काही मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली आहेत.
- 18 महिन्यांपेक्षा लहान मुलांना गॅजेट्सचा वापर करू देऊ नका, अशी सूचना केली आहे.
- 18 ते 24 महिन्याच्या काळात आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना उच्च गुणवत्ता असलेलेच कार्यक्रम दाखवावेत.
- 2 ते 5 वर्षांच्या मुलांना एका तासापेक्षा जास्तवेळ हे गॅजेट्स वापरू देऊ नयेत.
- सहा वर्षं आणि त्याहून अधिक वय असलेल्या मुलांचा स्क्रीन वापराबाबत वेळ निश्चित असावा. त्याचबरोबर त्यांना झोपण्यासाठी, खेळण्यासाठी पुरेसा वेळ असावा.
उत्तर;-
- प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या मतानुसार "एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की मुलं प्रचंड चिडचिड करतात, लहान मुलांना तर जेवणासाठीही मोबाईल हातात द्यावा लागतो, भेटीगाठी कमी झाल्याने मुलांमध्ये एकटेपणा वाढला आहे. अस्वस्थता, भीती, डिप्रेशन वाढले आहे.
- तरुण मुलांमध्येही आत्मसंयमाचा अभाव, जिज्ञासेचा अभाव दिसून येतो. भावनात्मकदृष्ट्या मुलं अस्थिर होत आहेत. हायपरॲक्टिव्ह डिसॉर्डर, डिप्रेशन आणि सोशल अँग्झायटी असलेली मुलं स्क्रीनकडे अधिक आकर्षित होतात.
- मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दहा ते वीस वर्षांच्या मुलांना रात्रभर मोबाईल पाहायची सवय लागली आहे. मुलांचा कुटुंबीयांशीही संवाद कमी झाला आहे. मोबाईल दिला नाही तर मुलं आक्रमक होतात, असंही पालक सांगतात.
- शारीरिक आरोग्याचा विचार करता, मोबाईल सतत वापर केल्याने मुलांना भविष्यात मान दुखी, पाठ दुखी, डोके दुखी आणि डोळ्यांचे आजार निर्माण होण्याचा धोका असतो. हातांची बोटे आखडणे यासारख्या शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.
- लहान मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्यास पालक--बालक संबंध बिघडतात. जेव्हा मुले स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात, तेव्हा ते पालकांशी संवाद साधणे कमी करतात. यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो.
- मुलांची स्वावलंबी होण्याची आणि स्वतःच्या कृतींप्रती प्रेरित होण्याची क्षमता कमी होते. पालकांऐवजी ते फोन किंवा डिजिटल सामग्रीकडून प्रेरणा घेऊ लागतात. तुम्ही पारंपरिक किंवा मागास विचारांचे आहेत असे मुले पालकांना समजतात. त्यातून घरात वादंग किंवा भांडणे देखील उद्भवतात.
प्रश्न ५ वा. अभ्यासात मोबाईलच्या वापराचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव कसा पडतो?
- मुळात कोणतेही तंत्रज्ञान वाईट असत नाही आपण त्याचा उपयोग कशा पद्धतीने करतो त्यावर त्याचे चांगले आणि वाईट परिणाम ठरतात.
- मोबाईलचा उपयोग करून विद्यार्थी गणित, इंग्रजी, सायन्स किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करू शकतात. पण याचा अर्थ असा मुळीच नाही त्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्याची मुळीच गरज नाही. शाळा, कॉलेज, शिक्षक, प्रयोगशाळा यांची देखील तितकीच गरज आहे.
- वर्गातल्या तासाला बसल्याने मुलांची अमूर्त विचार करण्याची क्षमता, चिकित्सक विचार करण्याची क्षमता, विश्लेषण करण्याची क्षमता, नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता, लेखन आणि नवनिर्माण करण्याच्या क्षमता विकसित होतात.
- वर्गातल्या संकल्पना अधिक समजून घेण्यासाठी मोबाईलचा उपयोग केला पाहिजे. शिक्षकाला मोबाईल पर्याय होऊ शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे.
- Qustodio
- Norton Family
- Bark
- FamiSafe
- Google Family Link
- Mobicip
- Apple Screen Time
- FamilyTime
प्रश्न ७ वा. मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून वाचविण्यापासुन शाळा आणि शिक्षकाची भूमिका काय असावी ?
- जसे 21 वर्षाखालील तरुण सिगारेट ओढू शकत नाहीत, दारू पिऊ शकत नाहीत किंवा स्वत:च्या बंदुकी बाळगू शकत नाहीत, तसाच त्यांना सेल फोन ठेवता येणार नाही. असा कायदा करण्यासाठी शाळा आणि शिक्षक सध्यातरी पुढे येऊ शकत नाहीत. पण ते मोबाईलचा वापर विवेकी पद्धतीने कसा करावा याविषयी निश्चित जनजागृती करू शकतात.
- सेल फोन केवळ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक जीवनावर-वर्तमान आणि भविष्यकाळावरच परिणाम करत नाही. सेल फोन त्यांच्या शिकण्याच्या आणि उत्पादक बनण्याच्या क्षमतेत अडथळा आणत आहेत, याविषयी कार्यशाळा घेऊन जनजागृती करू शकतात.
- डॉ. सागर मुंदडा सांगतात, "मुलांना मोबाईल ऐवजी पर्यायी साधन देऊन पाहा. त्याचा वेळ, ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च होईल असे पर्याय उपलब्ध करा. पण तरीही मोबाईलशिवाय मुलं राहत नसतील, रात्रभर झोप येत नसेल, आक्रमक होत असतील तर मुलांना उपचाराची गरज आहे."
- डॉ. मुंदडा सांगतात, "सुरुवातीला आठवड्यातून एक किंवा दोन दिवस घरातील सर्वांनी मोबाईल फ्री डे पाळायला हवा. दिवसभरात कोणीही मोबाईल पाहणार नाही असे ठरवून करायला हवे. यामुळे सवयीवर नियंत्रण ठेवण्यास मुलांना मदत होईल.
- दिवसभरातही काही विशिष्ट वेळी मोबाईल पाहता येणार नाही असा नियम करा. यामुळे मुलांना संयम राखण्यास मदत होईल. सुरुवातीपासूनच असे नियम केले तर मुलांच्या सवयी नियंत्रणाबाहेर जाणार नाहीत. त्यांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होणार नाही."
Comments
Post a Comment