प्रश्न १ ला. लहान मुलांना मोबाईलचे व्यसन का लागते ? उत्तर- लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागण्याची अनेक कारणे आहेत: अगदी लहान बालक रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी पालक खेळण्याच्या ठिकाणी मोबाईलचा उपयोग करीत असतात. मुले देखील मोबाईल मधील फोटो, व्हिडीओ, कार्टून बघून शांत होतात. त्यातून लहान मुलांना मोबाईलची ओळख होते आणि हळूहळू मुले मोबाईल हाताळायला सुरुवात करतात. लहान मुले मोठ्या लोकांच्या वागण्या-बोलण्याचे अनुकरण करीत असतात. मोठे लोक जसे बोलतात तसेच ते बोलतात, जी भाषा घरातील किंवा आजूबाजूचे लोक बोलतात तीच भाषा ते शिकतात. लहान मुले सुद्धा मोठया लोकांच्या अनुकरणातूनच मोबाईलकडे वळतात. हळूहळू मोबाईल हाताळायला शिकतात. जेव्हा बालक मोबाईल हाताळतो आणि कुण्या नातेवाईकांचा आलेला फोन स्विकारतो तेव्हा पालकांकडून त्याचे मोठे कौतुक केले जाते. अशा प्रकारचे कौतुक बालकांसाठी एक प्रकारचे बक्षीस किंवा रिवार्ड असते. असेच मोबाईल मधील रिल्स, व्हिडीओ, फोटो यातून निर्माण होणारी उत्तेजना मेंदूतील डोपामाइन रिवॉर्ड सिस्टम सक्रिय करते. त्याच गोष्टी पुन्हा करून, पुन्हा बघून...
Posts
OE- Psychology of Happiness
- Get link
- X
- Other Apps
प्रकरण 1 ले आनंदाचा अर्थ आणि मापन खरं तर, आपल्या जीवनात आनंदाची खूप महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या जीवन जगण्यावर आनंदाचा मोठा प्रभाव पडत असतो. आ नंद ही अशी गोष्ट आहे जी लोक शोधू पाहतात, तरीही आनंदाची व्याख्या काय असते? ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये बदलू शकते. 1.1 आनंदाचा अर्थ (Meaning of Happiness) : सामान्यतः, आनंद ही एक भावनिक अवस्था आहे जी आनंद, समाधान आणि तृप्तीच्या भावनांनी दर्शविली जाते. आनंदाच्या अनेक भिन्न व्याख्या असल्या तरी, अनेकदा आनंद म्हणजे सकारात्मक भावना आणि जीवनातील समाधान अशी त्याची व्याख्या केली जाते. जेव्हा आनंदाच्या खऱ्या अर्थाविषयी बहुतेक लोक बोलतात, तेव्हा ते सध्याच्या क्षणी त्यांना कसे वाटते? याबद्दल बोलत असतात किंवा संपूर्ण जीवनाबद्दल त्यांना कसे वाटते? या अर्थाचा संदर्भ देत असतात. कारण आनंद हा एक व्यापकपणे परिभाषित शब्द आहे, मानसशास्त्रज्ञ आणि इतर सामाजिक शास्त्रज्ञ जेव्हा या भावनिक स्थितीबद्दल बोलतात तेव्हा सामान्यत: ' व्यक्तिगत कल्याण' हा शब्द वापरतात. आपल्याला या क्षणी किंवा संपूर्ण जीवनाविषयी जस...
वर्तनाचे जैविक आधार
- Get link
- X
- Other Apps
प्रकरण 3 रे वर्तनाचे जैविक आधार माणूस हसतो, रडतो, बोलतो, काम करतो, अभ्यास करतो, झोपतो या सगळ्या गोष्टीला वर्तन म्हणतात. माणूस 24 तास वर्तन करीत असतो. वर्तनाशिवाय माणसाचं जीवन जगणं मुश्किल बनून शकते. वर्तन करणाऱ्या व्यक्तीचे वर्तन आपण पाहू शकतो पण वर्तनाच्या पाठीमागे चालू असणाऱ्या ' जैविक क्रिया' आपण बघू शकत नाही. ह्या जैविक प्रक्रियांशिवाय माणूस वर्तन करूच शकत नाही. म्हणून मानवी वर्तनाच्या पाठीमागे सुरू असणाऱ्या जैविक प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे. मानवी वर्तनाच्या पाठीमागे कार्यरत असणाऱ्या जैविक प्रक्रियांमध्ये अनुवंशिकता, विविध अंतस्त्रावी ग्रंथी, मज्जापेशी आणि मज्जासंस्था किंवा मेंदू ह्या जैविक प्रक्रियांचा समावेश होतो. मज्जासंस्था म्हणजे मेंदू हा मानवी शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, जो मानवाच्या ' वर्तनावर नियंत्रण' ठेवतो. व्यक्तीचे बोलणे,चालणे, रडणे, हसणे, अभ्यास करणे, खेळणे यासारख्या सर्वच वर्तनावर मेंदूचे नियंत्रण असते. 3.1 गुणसूत्र (Cromosomes) : मानवी गुणसूत्र हा जीवनाचा मूलभूत बिल्डिंग ब्लॉक आहे आणि ते आई-वडिलांकडून त्यांच्या मुलांम...
2.5. व्यक्तिमत्व मापनाच्या पद्धती
- Get link
- X
- Other Apps
2.5.व्यक्तिमत्व मापनाच्या पद्धती : एखाद्या व्यक्तीमध्ये किती गुण आहेत? हे पाहण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची मापन केले जाते. तसेच व्यक्तिमत्व मोजमाप विशेषतः लोकांची एकमेकांशी तुलना करण्यासाठी उपयुक्त आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतील लोकांच्या व्यक्तिमत्व गुणधर्मात किती मोठा फरक आहे, हे पाहण्यासाठी देखील व्यक्तिमत्त्वाचे मापन केले जाते? उदाहरणार्थ अमेरिकेतील शिक्षक आणि भारतातील शिक्षक यांच्या व्यक्तिमत्त्वात कोणता फरक आहे, हे पाहण्यासाठी देखील व्यक्तिमत्त्वाचे मापन केले जाते. 1. प्रश्नावली : प्रश्नावली ही छापील किंवा लिखित प्रश्नांची एक मालिका असते, ज्याची उत्तरे व्यक्तीने लिखित स्वरूपात द्यायची असतात. प्रश्नावलीत दिलेले प्रश्न हे व्यक्तींच्या गरजा, परिस्थिती, नातेसंबंध आणि भावना यावर आधारलेले असतात. या प्रश्नाला होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर देणे अपेक्षित असते. सगळ्या प्रश्नांना गुण दिले जातात आणि शेवटी सर्व प्रश्नांच्या गुणांची गोळ्या बेरीज करून प्रश्नावलीचा गुणांक काढला जातो.MMPI, 16PF, Big Five Factors असे काही प्रश्नावलीचे उदाहरणे सांगता येतील. 2. मुलाख...