2.5. व्यक्तिमत्व मापनाच्या पद्धती

 2.5.व्यक्तिमत्व मापनाच्या पद्धती: एखाद्या व्यक्तीमध्ये किती गुण आहेत? हे पाहण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची मापन केले जाते. तसेच व्यक्तिमत्व मोजमाप विशेषतः लोकांची एकमेकांशी तुलना करण्यासाठी उपयुक्त आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतील लोकांच्या व्यक्तिमत्व गुणधर्मात किती मोठा फरक आहे, हे पाहण्यासाठी देखील व्यक्तिमत्त्वाचे मापन केले जाते? उदाहरणार्थ अमेरिकेतील शिक्षक आणि भारतातील शिक्षक यांच्या व्यक्तिमत्त्वात कोणता फरक आहे, हे पाहण्यासाठी देखील व्यक्तिमत्त्वाचे मापन केले जाते.

1. प्रश्नावली: प्रश्नावली ही छापील किंवा लिखित प्रश्नांची एक मालिका असते, ज्याची उत्तरे व्यक्तीने लिखित स्वरूपात द्यायची असतात. प्रश्नावलीत दिलेले प्रश्न हे व्यक्तींच्या गरजा, परिस्थिती, नातेसंबंध आणि भावना यावर आधारलेले असतात. या प्रश्नाला होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर देणे अपेक्षित असते. सगळ्या प्रश्नांना गुण दिले जातात आणि शेवटी सर्व प्रश्नांच्या गुणांची गोळ्या बेरीज करून प्रश्नावलीचा गुणांक काढला जातो.MMPI, 16PF, Big Five Factors असे काही प्रश्नावलीचे उदाहरणे सांगता येतील. 

2. मुलाखत: मुलाखत ही व्यक्तिमत्त्व मोजण्याची एक सामान्य पद्धत आहे. मुलाखत घेणारा प्रश्न विचारतो किंवा त्या व्यक्तीला मोकळेपणाने बोलू देतो. तो जे बोलतो त्यावरून, मुलाखतकाराला त्याच्या आवडी, समस्या, मालमत्ता आणि मर्यादांबद्दल माहिती मिळते. रचित आणि अरचित असे दोन प्रकार मुलाखतीचे पडतात. 

3. वर्तनाचे निरीक्षण: व्यक्तिमत्वाचे मापन  करण्यासाठी व्यक्ती वर्तनाचे निरीक्षण केले जाते. ज्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे मापन करायचे आहे, अशा व्यक्तीचे वेगवेगळ्या परिस्थितीत निरीक्षण केले जाते. त्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात कोणते आणि किती गुणधर्म आहेत हे शोधले जाते. 

4. प्रक्षेपण पद्धत: या तंत्राच्या साह्याने व्यक्तीच्या अंतर्गत व्यक्तिमत्त्वाचे मापन केले जाते. या पद्धतीत वापरले जाणारी सामग्री सामान्यत: तटस्थ, संदिग्ध किंवा कमी किंवा जास्त अपरिभाषित असते जेणेकरून त्या विषयावर व्यक्ती सहजपणे त्याच्या व्यक्तिमत्त्वाची छाप सोडू शकेल. त्याच्या इच्छा, त्याच्या वृत्ती, विश्वास, आदर्श, संघर्ष आणि कल्पना तो प्रक्षेपित करू शकेल. 

या पद्धतीमध्ये हर्ष्मन रोशार्क यांनी तयार केलेली "इन्क ब्लॉक टेस्ट" या चाचणीचा समावेश आहे. या चाचणीत वापरले जाणारे कार्ड शाईच्या डागापासून बनवलेले असतात. त्या शाईच्या डागाच्या चित्रांचा कोणताही अर्थ नसतो. ही कार्ड ज्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे मापन करायचं आहे अशा व्यक्तीला दाखवले जातात. या कार्डमध्ये "तुला काय दिसते" असे प्रश्न त्याला विचारले जातात. त्यांनी दिलेल्या उत्तरांची नोंद घेऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे मापन केले जाते. 

या पद्धतीत दुसरी चाचणी म्हणजे "थीमॅटिक अपेरसेप्शन टेस्ट" आहे. ही चाचणी मरे आणि मॉर्गन (1935) यांनी विकसित केली आहे. या पद्धतीचा उपयोग करून ज्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे मापन करायचे आहे, अशा व्यक्तींना काही "अर्थहीन चित्रांचे कार्ड" दाखवले जातात आणि त्याला त्यावर कथा लिहायला सांगितली जाते. त्यालाच कथा आसंवेदन चाचणी म्हणतात. व्यक्ती आपल्या मनातील विचारानुसार त्या चित्रावर कथा लिहितो आणि त्याच्यातून त्याचे व्यक्तिमत्व मोजले जाते.

तसेच या पद्धतीमध्ये अपूर्ण वाक्य चाचणीचा देखील समावेश केला जातो.  रोटर, स्टीन आणि इतर अनेकांनी दिलेले अपूर्ण वाक्य तंत्र हे कागद-आणि-पेन्सिल व्यक्तिमत्व यादीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये असोसिएशन चाचणी तसेच प्रोजेक्टिव्ह तंत्राची वैशिष्ट्ये आहेत. विषय अनेक अपूर्ण वाक्यांसह दर्शविला जातो जो तो त्याच्या आवडीनुसार पूर्ण करतो. 











Comments

Popular posts from this blog

OE- Psychology of Happiness

FYBA SEM II

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती