वर्तनाचे जैविक आधार

प्रकरण 3 रे

वर्तनाचे जैविक आधार


माणूस हसतो, रडतो, बोलतो, काम करतो, अभ्यास करतो, झोपतो या सगळ्या गोष्टीला वर्तन म्हणतात. माणूस 24 तास वर्तन करीत असतो. वर्तनाशिवाय माणसाचं जीवन जगणं मुश्किल बनून शकते. 


वर्तन करणाऱ्या व्यक्तीचे वर्तन आपण पाहू शकतो पण वर्तनाच्या पाठीमागे चालू असणाऱ्या 'जैविक क्रिया' आपण बघू शकत नाही. 


ह्या जैविक प्रक्रियांशिवाय माणूस वर्तन करूच शकत नाही. म्हणून मानवी वर्तनाच्या पाठीमागे सुरू असणाऱ्या जैविक प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे.

मानवी वर्तनाच्या पाठीमागे कार्यरत असणाऱ्या जैविक प्रक्रियांमध्ये अनुवंशिकता, विविध अंतस्त्रावी ग्रंथी, मज्जापेशी आणि मज्जासंस्था किंवा मेंदू ह्या जैविक प्रक्रियांचा समावेश होतो. 

मज्जासंस्था म्हणजे मेंदू हा मानवी शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, जो मानवाच्या 'वर्तनावर नियंत्रण' ठेवतो. व्यक्तीचे बोलणे,चालणे, रडणे, हसणे, अभ्यास करणे, खेळणे यासारख्या सर्वच वर्तनावर मेंदूचे नियंत्रण असते.  

3.1 गुणसूत्र (Cromosomes)

मानवी गुणसूत्र हा जीवनाचा मूलभूत बिल्डिंग ब्लॉक आहे आणि ते आई-वडिलांकडून त्यांच्या मुलांमध्ये उतरत असतात. यालाच आपण मानसशास्त्रात 'अनुवंशिक वारसा' म्हणतो.

स्त्री-पुरुषांच्या गुणसूत्रांचे साधारणपणे ऑटोसोम्स आणि गोनोसोम्स असे दोन प्रकार पाडले जातात. 

  • ऑटोसोम्स-मानवामध्ये ऑटोसोमच्या 22 जोड्या असतात. शरीरातील बहुतेक अनुवांशिक वैशिष्ट्यांसाठी हे कोड.
  • गोनोसोम्स किंवा सेक्स क्रोमोसोम्स- मानवामध्ये दोन प्रकारचे सेक्स क्रोमोसोम असतात ज्यात X आणि Y समाविष्ट असतात. पुरुषांमध्ये X आणि Y क्रोमोसोम असतात, तर महिलांमध्ये दोन X गुणसूत्र असतात.

गुणसूत्रे ही पेशींच्या मध्यभागी (न्यूक्लियस) आढळणारी रचना आहेत. जी DNA (Deoxyribonucleic Acid) चे लांब तुकडे वाहून नेतात. DNA ही जीन्स किंवा रंगमणी ठेवणारी सामग्री आहे. 

जीन्स माणसाचे वैशिष्ट्ये ठरवतात, जसे की डोळ्याचा रंग, रूप सौंदर्य, त्वचेचा रंग, उंची आणि रक्त प्रकार ठरतात. 

साधारणपणे, मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या  असतात. गुणसूत्राच्या 23 जोड्या आईकडून आणि 23 जोड्या वडिलांकडून मुलांमध्ये येतात. गुणसूत्रांच्या एकूण 46 जोड्या मुलांमध्ये येत असतात. स्त्रियांच्या 23 जोड्या ह्या xx प्रकारच्या असतात तर पुरुषांच्या 22 जोड्या xx प्रकारच्या असून 23 वी जोडी ही xy प्रकारची असते. जेव्हा पुरुषांच्या xx आणि स्त्रियांच्या xx या जोड्यांचा संयोग होतो, तेव्हा होणारे मुल हे मुलगी असते. तसेच जेव्हा पुरुषांच्या xy आणि स्त्रियांच्या xx या जोड्यांचा संयोग होतो, तेव्हा होणारे मुल हे मुलगा असते. गर्भाच्या लिंग निश्चितीमध्ये आईपेक्षा वडिलांची भूमिका महत्त्वाची असते. 

जनुके किंवा रंगमणी

जीन्स हे अनुवंशिकतेचा मूलभूत घटक आहेत, जो डीएनए अनुक्रमांपासून बनलेली आहे. 


जीन्स माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जाते. ते व्यक्तीचे गुणधर्म, वैशिष्ट्ये आणि कार्ये निर्धारित करतात. प्रबळ जीन आणि अप्रबळ जीन असे दोन प्रकार पडतात. मुलांमध्ये काही जीन्स आईंचे प्रबळ ठरतात तर काही जीन्स हे वडिलांचे प्रबळ ठरू शकतात. 


DNA: DNA किंवा deoxyribonucleic acid हा एक रेणू आहे, ज्यामध्ये अनुवांशिक कोड असतो, जो प्रत्येक व्यक्तीसाठी अद्वितीय असतो.

आपले शरीर बनवणारी सर्व प्रथिने तयार करण्यासाठी आणि त्यांची भरभराट होण्यास मदत करण्यासाठी या कोडचा एक सूचना पुस्तिका म्हणून विचार होतो. 

डीएनएमध्ये कोड केलेली माहिती आनुवंशिक असते, म्हणजे ती पालकांकडून मुलांमध्ये उतरते. या आनुवंशिक वारशामुळे, डीएनए आपली गुणवैशिष्ट्ये देखील निर्धारित करतो: आपण कसे दिसतो आणि आपण आपल्या पालकांशी किती मिळतेजुळते आहोत, आपला रंग कसा आहे, उंची किती आहे. डीएनएमध्ये कोड केलेली ही वैशिष्ट्ये नेहमी पिढ्यानपिढ्या प्रसारित केली जातात. 

जुळी मुले: काही स्त्रिया प्रसूती (Maternity) दरम्यान एकाच वेळी दोन किंवा तीन बाळांना (Twins) जन्म देतात. वैद्यकीय शास्त्रानुसार, शुक्राणूंपासून फक्त एकच मूल जन्माला येतो, मग जुळ्या मुलांच्या मागे तर्कशास्त्र काय आहे. जुळ्या मुलांच्या मागे दोन शुक्राणू आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर याचं उत्तर नाही असं आहे. खरं तर पहिला शुक्राणू अंडीत प्रवेश करताच स्वतःला सिल करुन घेतो त्यामुळे इतर कोणतेही शुक्राणू (Sperm) तिथे प्रवेश करू शकत नाहीत, मग जुळ्यांचा जन्म कसा होतो? 

जुळे मुलं कशी जन्माला येतात ? जुळ्यांचे दोन प्रकार आहेत, आयडेंटिकल आणि नॉन-आयडेंटिकल. वैद्यकीय भाषेत, त्यांना मोनोझिगोटीक आणि डायझिगोटीक म्हणतात. सहसा, महिलेच्या शरीरात अंडी असते जे शुक्राणूंच्या सहाय्याने एक गर्भ तयार करते. मात्र या गर्भात अनेकदा एक नव्हे तर दोन मुले तयार होतात. ही जुळी मुलं एकाच अंड्यातून तयार झालेली असतात, त्यामुळे त्यांची नाळ देखील समान असते. या अवस्थेत एकतर दोन मुलं जन्माला येतात किंवा दोन मुली. त्यांचे फिंगरप्रिंट्स वेगळे असले तरी ते सामान्यत: दिसायला एकसारखे असतात आणि त्यांचे डीएनए देखील एकमेकांसारखेच असतात. अशा मुलांना मोनोझिगोटिक जुळे म्हणतात.


3.2. चेतापेशी (Neurons): चेतासंस्था ही प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे. ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची मिळून  बनलेली आहे. 





Comments

Popular posts from this blog

FYBA SEM II

भीती जगात नाही, तर मनात आहे..

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती