व्यक्तिमत्व
व्यक्तिमत्व (Personality) व्यक्तिमत्व विकास केवळ एखाद्या व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनातच नव्हे; तर वैयक्तिक जीवनातही महत्त्वाची भूमिका बजावतो. व्यक्तिमत्व हे सकारात्मक विचार, सुंदरता, शिस्तबद्धपणा, वक्तशीरपणा, प्रामाणिकता आणि मेहनत ह्या सारख्या गुण आणि दोषांनी बनते. हे गुण त्या व्यक्तीची स्वतःची व्यक्तिगत संपत्ती असते. काही गुण-दोष जन्मतःच असतात; तर काही गुण-दोष जन्म झाल्यापासून व्यक्ती सभोतालच्या परिस्थितून शिकत असतो. कोणत्याही व्यक्तीने त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसा व्यवसाय निवडल्यास त्यात तो यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. कारण तिथे त्याच्या अंगी असलेल्या गुणांचा उपयोग करायला वाव असते. त्यामुळे तो आनंदाने काम करतो; कमी वेळात जास्तीत जास्त आणि सुंदर दर्जेदार काम करतो; कामाच्या नवनवीन पद्धती शोधतो; कामात दररोज तो काहीतरी नवीन करून पाहण्याचा प्रयत्न करतो. आजच्या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासोबतच आनंदी जगणे अत्यावश्यक झाले आहे. आज अनेक कंपन्या नोकर भरती करताना विविध गुण संपन्न व्यक्तिमत्वाच्या लोकांना प्राधान्य देतात . त्यामुळे प्रत्य...