व्यक्तिमत्व

 व्यक्तिमत्व

(Personality)


व्यक्तिमत्व विकास केवळ एखाद्या व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनातच नव्हे; तर वैयक्तिक जीवनातही महत्त्वाची भूमिका बजावतो. व्यक्तिमत्व हे सकारात्मक विचार, सुंदरता, शिस्तबद्धपणा, वक्तशीरपणा, प्रामाणिकता आणि मेहनत ह्या सारख्या गुण आणि दोषांनी बनते. हे गुण त्या व्यक्तीची स्वतःची व्यक्तिगत संपत्ती असते. काही गुण-दोष जन्मतःच असतात; तर काही गुण-दोष जन्म झाल्यापासून व्यक्ती सभोतालच्या परिस्थितून  शिकत असतो. कोणत्याही व्यक्तीने त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसा व्यवसाय निवडल्यास त्यात तो यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. कारण तिथे त्याच्या अंगी असलेल्या गुणांचा उपयोग करायला वाव असते. त्यामुळे तो आनंदाने काम करतो; कमी वेळात जास्तीत जास्त आणि सुंदर दर्जेदार काम करतो; कामाच्या नवनवीन पद्धती शोधतो; कामात दररोज तो काहीतरी नवीन करून पाहण्याचा प्रयत्न करतो. आजच्या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासोबतच आनंदी जगणे अत्यावश्यक झाले आहे. आज अनेक कंपन्या नोकर भरती करताना विविध गुण संपन्न व्यक्तिमत्वाच्या लोकांना प्राधान्य देतात. त्यामुळे प्रत्येक माणसाने स्वतःचे व्यक्तिमत्व समजून घेऊन त्याला अधिकाधिक विकसित करणे गरजेचे आहे. 

    

व्यक्तिमत्वाची व्याख्या:- पर्सनॅलिटी हा शब्द लॅटिन भाषेतील पर्सोना (Persona) या शब्दापासून पासून आला आहे. प्राचीन जगात व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेत्याने कला सादर करताना घातलेला मुखवटा आहे. नाटक, कादंबरी इ. मधील पात्र आहे. नाट्यमय मुखवटा मूलतः एखाद्या पात्राच्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य दर्शवण्यासाठी किंवा प्रक्षेपित करण्यासाठी प्राचीनकाळी वापरला जात असे. कोणताही कलाकार एखादी व्यक्तिरेखा साकारताना तो त्या व्यक्तिरेखेत असणारे गुणदोष तो त्याच्या अभिनयातून साकारतो. मानसशास्त्रात स्वत:चे हेतू स्वत:ला व इतर लोकांना दर्शवताना व्यक्तीकडून घेतली जाणारी भूमिका म्हणजे व्यक्तिमत्व आहे

फिलिप एस. होल्झमन (2022) यांच्या मतानुसार व्यक्तिमत्व, म्हणजे व्यक्तीचे विचार, भावना आणि वागण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. त्यात व्यक्तीचे मूड (moods), वृत्ती (attitudes) आणि मते (opinions) यांचा समावेश होतो आणि इतर लोकांशी संवाद साधताना ते स्पष्टपणे व्यक्त होते. 

व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे वर्तन, विचार, प्रेरणा आणि भावना यांचा इतरांवर पडणारा प्रभाव किंवा छाप आहे. फारच थोडे लोक आपल्या बाह्य आणि आंतरिक सौंदर्याने इतर लोकांना प्रभावित करतात. 

     व्यक्तिमत्व म्हणजे विचार, भावना आणि वागण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण नमुन्यांमधील व्यक्ती-व्यक्ती मधला वैयक्तिक फरक आहे. काही अपवाद वगळता बहुतेक माणसाला हात, पाय, डोळे, कान असे शारीरिक अवयव जरी सारखे असले; तरी मानसिक गुणधर्माने प्रत्येक माणूस इतरांपेक्षा अद्वितीय (unique) आहे. व्यक्तिमत्वातील गुणधर्मामुळे समाजात व्यक्तीभिन्नता (Individual differences) दिसते. 

  व्यक्तिमत्व दीर्घकाळ टिकून राहिलेल्या वैशिष्ट्यांचा आणि नमुन्यांचा संदर्भ देते; जे व्यक्तींना सातत्याने विचार करण्यास आणि विशिष्ट वर्तन नमुण्यानुसार वर्तन करण्यास प्रवृत्त करते. 

  व्यक्तिमत्त्व दीर्घकालीन स्थिर परंतू बदलणारे आहे. संपुर्ण व्यक्तीमत्व बदलता येत नाही; पण त्यामधील अडचणीचे ठरणारे घटक प्रयत्नाने बदलता येतात. काही बदल व्यक्ती  स्वतः जाणीवपूर्वक करतो; तर काही बदल अजानपणे होतात. 


Comments

Popular posts from this blog

FYBA SEM II

मानसशास्त्राची ओळख

भीती जगात नाही, तर मनात आहे..