Posts

Showing posts from 2020

आनंद हा बाहेरून येत नाही; तो आपल्या आतून येतो

कोणताही माणूस नुसता हाडामासाचा गोळा नसतो. माणसाचं बाह्यरूप हे डोळ्याने दिसणारे भौतिक स्वरूप आहे. पण माणूस फक्त भौतिक स्वरुपापुरता सिमीत नाही. तर त्या पलीकडे तो अफाट पसरलेल्या समुद्रासारखा आहे. ते अफाट रूप म्हणजे ते त्याचं मानसिक जग आहे. ज्याविषयी माणसाला फारच थोडी माहिती असते. बहुधा आपल्यापकी लोक आकाशातील ग्रहाचे, जमिनीतील खडकांचे, माहिती तंत्रज्ञांचे ज्ञान सतत आत्मसात करून स्वतःला  अद्यावत करीत असतात; पण स्वतःविषयी फारच अज्ञानी असतात. अशा व्यक्तींना स्वतःविषयी बोलण्यास सांगितल्यास फारच अल्प माहिती सांगू शकतात. परंतु एखाद्या विषयावर हिच व्यक्ती तास-दोन तास अगदी भरभरून बोलत असतात. आपण स्वतःविषीयी इतके अनभिज्ञ का असतो? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर जन्मापासुन माणुस हा बहिर्मुखी असतो. त्यामुळे तो सतत बाहेरील गोष्टी अनुभवत असतो. आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तो बाह्य जगात शोधतो. आपल्या जीवनातील समस्यांना देखील तो बाह्य जगातील लोकांना जबाबदार मानतो. तो कधी स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास तयार नसतो. काही चांगल्या गोष्टी घडल्या की त्याचं श्रेय स्...

लॉकडाऊन मधील गरीबांची पायपीट

Image
लॉकडाऊन मधील गरीबांची पायपीट   आपला गावसोडून शहराकडे जाणारी माणसं आज खूप पश्चाताप करू लागली. कोणी शेतीवाडीत काम मिळत नव्हतं म्हणून शहरात गेली. गावातल्या मजुरीपेक्षा शहरात चार पैसा जास्त मिळतो म्हणून काहीनी आपली घरं सोडली. काहीनी सावकाराचं बक्कळ कर्ज फेडायचं म्हणून गावातली घरं ओस पाडली. काहीजण तर " शहरात हाताला मिळेल ती मोलमजुरी करू, पण गावातली सालं-महिने भरणं आता नको रं बाबा" असं म्हणत शहरवासी झाली. गावातल्या शाळेत मुख्याध्यापक असेल तर वर्गशिक्षक नसतो. मुख्याध्यापक सुट्टीवर गेला की वर्गशिक्षक मोबाईलमध्ये गुंग. शिक्षणाच्या नावानं नुसती बोंबाबोंब. शहरात पोरांना चांगलं शिक्षण तरी मिळेल, म्हणून काहीनी गाव पोरका केला. अर्थात गावात देखील काही शिक्षक अजूनही छान काम करीत आहेत. स्वतःमधला शिक्षक त्यांनी मोठ्या मेहनतीनं जपला आहे. असेच सर्व शिक्षक काम करू लागली, तर आज सुद्धा खाजगी शाळांपेक्षा सरकारी शाळांना चांगले दिवस येतील. गमावलेला विश्वास परत मिळविता येईल. पण आज जे जे सरकारी आहे, ते ते उपयोगाचं नाही, असा समज जवळपास सगळीकडे...

गुलमोहर

Image
गुलमोहर आठवणींचे प्रत्येक क्षण काटेरी होत जातात मन रक्ताळतं एकाकीपणात वाटतं एकदातरी बघावा तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावरचा गुलमोहर ….. डॉ. नागोराव डोंगरे , शिरपुर मो. 8600304309

लॉकडाऊन आणि सकारात्मकता

Image
 लॉकडाऊन आणि सकारात्मकता       संपूर्ण जगात कमी अधिक प्रमाणात सगळीकडे लॉकडाऊन सुरु आहे. कोरोना महामारीतून सुटका करण्याचा एक हमखास उपाय म्हणून संपूर्ण जग लॉकडाऊन कडे बघत आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण स्वतःहून स्विकारतो किंवा निवडतो तेव्हा ती आपल्याला निश्चत आनंद देणारी असते. पण जेव्हा एखादी गोष्ट आपली मानसिक तयारी नसताना लादली जाते, तेव्हा ती मात्र त्रासदायक वाटण्याची अधिक शक्यता असते. लॉकडाऊन आपल्या सुरक्षेसाठी जरी असला तरीही आपली मानसिक तयारी नसताना लादलेला खबरदारीचा एक उपाय आहे. ज्यात आपल्याला घरात राहूनच कोरोना महामारीला संपवायचं आहे. तिचा जगभर होणारा फैलाव रोखायचा आहे. आपल्या घरात राहून वारंवार हात धुणं, सॅनेटाईज करणं, घराबाहेर पडल्यावर सुरक्षित अंतर ठेऊन वागणं हि खबरदारी सर्वांनी घेणं आवश्यक आहे. आपल्यापैकी बहुतेक लोक दररोज हि काळजी घेत असतीलच, परंतु काहींकडून हलगर्जीपणा जर झाला तर आपल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. "मला जसं वाटेल तसं मी वागेन" हे व्यक्ती स्वातंत्र्य जपण्याची हि वेळ नाही. आपण एकमेकांशी जोडलेले आहोत. म...

सकारात्मकतेकडून आनंदाकडे

Image
सकारात्मकतेकडून आनंदाकडे डॉ. नागोराव डोंगरे, मानसशास्त्र विभाग,एस.पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे  मानसशास्त्र हे माणसाच्या वर्तनाचं अभ्यास करणारं शास्त्र आहे. आपल्या वर्तनाने इतरांना दुःख  होणार नाही, सर्वांचे हित साधले जाईल, ज्यात आपलं देखील हित समाविष्ट असेल, अशा वर्तनाला आपणास सकारात्मक वर्तन म्हणता येईल. परंतु जेव्हा काय सकारात्मक आणि काय नकारात्मक हे ठरवायचं असतं, तेव्हा आपण स्वतःच्या स्वार्थी प्रवृतीं, आपल्या पारंपारिक धार्मिक श्रद्धा, सामाजिक चालीरीती आणि आपले वैयक्तिक पूर्वग्रह यानुसार आपण ते  ठरवीतो.  त्यामुळे निश्चितच सकारात्मकता आणि नकारात्मकता यांच्या संकुचित व्याख्या तयार होऊ शकतात. संकुचित व्याख्या कोणत्याही शास्त्रात उचित ठरणार नाहीत. तशाच त्या मानसशास्त्राला देखील योग्य ठरणार नाहीत. माणसाकडून होणारे कोणतेही वर्तन जे इतराना त्रासदायक ठरणारे, इतरांचा आनंद हिरावून घेणारे, त्यांची सुखशांती घालविणारे, समाजात दुही माजविणारे, विसंवाद निर्माण करणारे, इतरांसोबत स्वतःचा आनंद कमी करणारे वर्तन सकारात्मक वर्तन होऊ...

सकारात्मक गुण

Image
         सकारात्मक गुण  कोणत्याही माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या अंगी असणाऱ्या  गुण-दोषांचं संमिश्रण असतं. अगदी महापुरुष देखील याला अपवाद नसतात. प्रत्येकाच्या अंगी जसे गुण असतात तसेच काही दोष देखील असतात. हे नाकारता येणार नाही.  काही लोकांमध्ये गुणाचं प्रमाण अधिक असतं तर काहींमध्ये दोदोषांचं प्रमाण अधिक असतं. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे लोकांचं व्यक्तिमत्व त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांनी  उठून दिसतं, तर काही लोक आपल्या दोषांमुळे लोकांमध्ये प्रसिद्ध होतात. कोणी सकारात्मक गुणांनी प्रसिद्ध व्हायचं की नकारात्मक गुणांनी व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु  माणसाची ओळख  समाजात निर्माण करण्यात  त्याच्या अंगी असलेले गुणदोष अत्यंत महत्वाची भूमिका पार पडतात, ही काळ्या गडावरील रेष  आहे.       माणसाच्या स्वतःवर आणि त्याच्या अवती-भोवती असणाऱ्या परिस्थितीवर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या  गुणांना सद्गुण अथवा सकारात्मक गुण म्हणता येईल. ज्या गुणांमुळे व्यक्ती...
Image
सकारात्मक गुण लोकांना त्यांच्याकडे  आकर्षित करतात. जेव्हा कोणीतरी हसऱ्या चेहऱ्याची, उदार दयाळू , अभ्यासू,  गोड आवाजात बोलणारी आणि अतिशय विनम्र व्यक्ती दिसल्यास वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते. लोभस व्यक्तिमत्व आपणास भारावून टाकते. वैयक्तिक सकारात्मक गुण असंख्य सांगता येतील. उदा . दयाळू, कोमल, विचाराने ठाम, कठोर परिश्रम, विश्वासु, प्रामाणिक, जबाबदार, व्यवहारीक, तंदुरुस्त, सर्जनशील, अष्टपैलू आणि संवेदनशील असे अनेक सकारात्मक गुण सापडतील. यादी करावयाची झाल्यास खूप मोठी यादी निर्माण होईल. आता आपण काही महत्वपूर्ण सकारात्मक गुणांची चर्चा करणार आहोत.  काही महत्वाचे सकारात्मक गुण : १) कृतज्ञता : माणसाला जीवनात अनेक लोकांची मदत मिळालेली असते. आपल्या पूर्वजांनी बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे आपले जीवन फार व्यवस्थित आणि सुसह्य झालेलं असतं . आपल्या कर्तृत्वाच्या उड्या त्यांच्या पूर्वकर्मांवर अवलंबून असतात. अर्थात याची जाणिव आपल्याला असायला हवी. आज मी जो काही आहे, त्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत, त्यांच्यासाठी मी काही केलं पाहिजे,...

आर्थिक मानसशास्त्र

Image
मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या दोन्ही शाखा मानवाचा अभ्यास करतात. बाजारात वस्तूची निवड करणे, वस्तूची इतर वस्तूंशी तुलना करणे, वस्तू खरेदी करणे, तिचा उपयोग करणे ह्या सर्व गोष्टी वर्तनात समाविष्ट असतात. वस्तूची खरेदी जसे वर्तनाचा भाग आहे, तसेच वस्तूच्या उपभोगातून मिळणारा आनंद देखील वर्तनाचाच एक भाग आहे. माणसाची आर्थिक प्रगती त्याची विचार प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया, समस्यांचे आकलन यासारख्या अनेक मानसिक प्रक्रियांवर अवलंबून असते. आर्थिक मानसशास्त्र हि आंतरविद्याशाखीय एक महत्वाची अभ्यास शाखा आहे. ज्यामध्ये, माणसाच्या आर्थिक वर्तणुकीचा त्याच्या मनाच्या अवस्थांवर, आर्थिक स्थितीवर, व्यक्तीच्या सामाजिक स्थानावर, वैयक्तिक वर्तन आणि मानसिक जीवनावर होणारा परिणाम व कारणांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास केला जातो.    शासनाचे  आर्थिक धोरण यशस्वी होण्यासाठी मानसशास्त्रीय घटक अत्यंत महत्वाचे असतात. त्यात देशातील लोकांचा सरकारच्या आर्थिक धोरणांवर विश्वास आहे का? ग्राहक आशावादी आहेत कि निराशावादी आहेत? शासनाच्या आर्थिक धोरणांचा लोकांची बचत आणि कर्जावर काय परिणाम होतो...

मानसशास्त्रातील नवीन विचारप्रवाह

मानसशास्त्रातील नवीन विचारप्रवाह  डॉ. नागोराव डोंगरे  विभाग प्रमुख, मानसशास्त्र विभाग  एस.पी .डी .एम .महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे (महाराष्ट्र)  मानसशास्त्र, मानवी मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे मानसशास्त्र हा मानवी वर्तनाचे बहुविध पैलू अभ्यासणारा, दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा, माणसाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारा आणि जीवनात अधिकाधिक आनंद वाढविणारा एक  महत्वाचा  विषय आहे. माणसाच्या जगण्याचा अंतिम हेतू काय? असा प्रश्न जर कोणी विचारला, तर याचे उत्तर व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. पण आनंद मिळविणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा अंतिम हेतू असलेला बघावयास मिळतो.       आपण बघत आहोत की, औधोगिक क्रांती, माहिती तंत्रज्ञान यांनी माणसाचं संपूर्ण जीवन व्यापून टाकलं आहे. अगदी छोट्या बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक हाती हल्ली स्मार्ट फोन दिसतो.  फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप  सारख्या समाज माध्यमांवर सगळ्यांना फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचा मोह आवरत नाही. व्हाट्सअप ग्रुपवरची खडाजंगी चर्चा, व...