Posts

स्व-संकल्पना (Self Concept)

 'स्व-संकल्पना' (Self Concept) ही एक संज्ञा आहे; जी आपण स्वतःबद्दल बाळगत असलेले विश्वास,अभिरुची,कौशल्ये आणि प्रवृत्तीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते. यात आपले वर्तन आणि क्षमतांपासून ते अद्वितीय वैशिष्ट्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. आमची स्व-संकल्पना निश्चित नाही परंतु आपण जसे शिकतो, वाढतो आणि नवनवीन अनुभव घेतो तसतसी काळानुसार बदलू शकते. यावरून आपल्या हे लक्षात येते; स्व संकल्पना हि जन्मजात नाही; तर ती जन्मानंतरच्या अनुभवातून विकसित होते.  

व्यक्तिमत्त्वांचे सिद्धांत

2. 3. व्यक्तिमत्त्वाचे गुणतत्त्व सिद्धांत: (TraitsTheories of Personality) व्यक्तिमत्त्वाचा गुणधर्म किंवा गुणतत्त्व  सिद्धांत सूचित करतो की, लोकांमध्ये काही मूलभूत गुणवैशिष्ट्ये आहेत आणि ती त्या गुणवैशिष्ट्यांची ताकद आणि तीव्रता आहे, जी   दोन लोकांच्या व्यक्तिमत्त्वात फरक असण्यासाठी कारणीभूत ठरते.  गुणवैशिष्ट्य सिद्धांत सूचित करते की, लोकांचे  वैयक्तिक व्यक्तिमत्त्व हे व्यापक स्वभाव गुण-दोषांनी बनलेली असतात. गुणवैशिष्ट्य म्हणजे  काय आहे?   स्वभाव गुण वैशिष्ट्ये म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणवैशिष्ट्ये असतात, जे सुसंगतपणा, स्थिरता आणि व्यक्तीपरत्वे बदल असे तीन निकष पूर्ण करतात.  या व्याख्येच्या आधारे, एखाद्या स्वभाव वैशिष्ट्याचा तुलनेने स्थिर वैशिष्ट्य म्हणून विचार केला जाऊ शकतो, ज्यामुळे व्यक्ती विशिष्ट प्रकारे वागतात. विविध गुणवैशिष्ट्यांचे संमिश्रम आणि परस्परसंवाद प्रत्येक व्यक्तीसाठी अद्वितीय व्यक्तिमत्व तयार करते.   गुण वैशिष्ट्य सिद्धांत या लोकांच्या वैयक्तिक व्यक्तिमत्त्वाची  गुण वैशिष्ट्य  ओळखणे आणि मोजणे यावर लक्ष के...

चाचणी क्रमांक १

 प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच) ०५ मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या सांगा?व र्तन म्हणजे नेमकं काय ?P sychology इंग्रजी शब्द कोणत्या दोन शब्दांपासून तयार झाला?व्य क्तिमत्वाची व्याख्या लिहा.P Persona या इंग्रजी शब्दाचा अर्थ सांगा.नै सर्गिक निरीक्षणाची व्याख्या सांगा.च चीकित्सा मानसशास्त्र कशाला म्हणतात? प्रश्न दुसरा टिपा द्या. (कोणत्याही दोन) १० समुपदेशन मानसशास्त्रप्रा योगिक निरीक्षण पद्धतव्य व्यक्तिमत्वव वर्तनवाद  प्रश्न तिसरा कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.10 मानसशास्त्राची व्याख्या सांगून मानसशास्त्राच्या कोणत्याही पाच शाखांची माहिती लिहा.व्य व्यक्तिमत्वाची व्याख्या सांगून व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.

व्यक्तिमत्वाला आकार देणारे घटक

  २. १. व्यक्तिमत्वाला आकार देणारे घटक (Factors of shaping Personality) : आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे किंवा व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत योगदान देणारे अनेक घटक आहेत. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण करून ते आपण सहज समजू शकतो. ते घटक खालीलप्रमाणे सांगता येतात.  १ . अनुवांशिक देणगी (Genetic endowment) : आपल्या वर्तनाची काही वैशिष्ट्ये हे अनुवांशिक आहेत. जी आपल्याला पूर्वजाकडून वारशाने मिळतात. शारीरिक उंची, रंग, रूपसौंदर्य, सडपातळपणा, निपुणता, बौद्धिक क्षमता, शिकण्याची क्षमता, तार्किक सामर्थ्य, आवडी-निवडी इत्यादी काही वैशिष्ट्ये पूर्वीच्या पिढीकडून  वारशाने मिळतात. शारीरिक किंवा मानसिक गुण वैशिष्ट्यांचे अनुवांशिकरित्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणे म्हणजे अनुवांशिकता आहे. जशी खाण तशी माती ही म्हण अनुवांशिकता सूचित करते. तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर ‘तुमच्या घरात पूर्वी कोणाला हा आजार झाला होता का?’ असा प्रश्न विचारुन हा आजार अनुवांशिक आहे का? याचा शोध डॉक्टर घेतात. ही अनुवांशिक देणगी एका पिढीकडून-दुसऱ्या पिढीकडे ‘जीन’ ( genes ) च्या माध्यमातून संक्रमित केल...

व्यक्तिमत्व

Image
  व्यक्तिमत्व (Personality) व्यक्तिमत्व विकास केवळ एखाद्या व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनातच नव्हे; तर वैयक्तिक जीवनातही महत्त्वाची भूमिका बजावतो. व्यक्तिमत्व हे सकारात्मक विचार, सुंदरता, शिस्तबद्धपणा, वक्तशीरपणा, प्रामाणिकता आणि मेहनत ह्या सारख्या गुण आणि दोषांनी बनते. हे गुण त्या व्यक्तीची स्वतःची व्यक्तिगत संपत्ती असते. काही गुण-दोष जन्मतःच असतात; तर काही गुण-दोष जन्म झाल्यापासून व्यक्ती सभोतालच्या परिस्थितून  शिकत असतो. कोणत्याही व्यक्तीने त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसा व्यवसाय निवडल्यास त्यात तो यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. कारण तिथे त्याच्या अंगी असलेल्या गुणांचा उपयोग करायला वाव असते. त्यामुळे तो आनंदाने काम करतो; कमी वेळात जास्तीत जास्त आणि सुंदर दर्जेदार काम करतो; कामाच्या नवनवीन पद्धती शोधतो; कामात दररोज तो काहीतरी नवीन करून पाहण्याचा प्रयत्न करतो. आजच्या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासोबतच आनंदी जगणे अत्यावश्यक झाले आहे. आज अनेक कंपन्या नोकर भरती करताना विविध गुण संपन्न व्यक्तिमत्वाच्या लोकांना प्राधान्य देतात . त्यामुळे प्रत्य...

मानसशास्त्रातील करिअर

Image
  मानसशास्त्रातील करिअर (Career in Psychology) :  क्लिनिकल सायकॉलॉजी / पुनर्वसन आणि समुपदेशन मानसशास्त्र -सरकारी आणि खाजगी रुग्णालये, एनजीओ, खाजगी दवाखाने, समाजामध्ये परवानाधारक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करू शकतात.  फॉरेन्सिक सायकोलॉजी -या क्षेत्रातील लोक पोलीस विभाग, गुन्हे शाखा, संरक्षण/लष्कर, कायदा संस्था, ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन इत्यादींमध्ये सल्लागार म्हणून काम करू शकतात.  शालेय मानसशास्त्र -सार्वजनिक आणि खाजगी शाळा, विद्यापीठे, मानसिक आरोग्य केंद्रे, समुदाय-आधारित उपचार केंद्रे, निवासी दवाखाने आणि रुग्णालये, बाल न्याय कार्यक्रम आणि खाजगी दवाखाने येथे शालेय मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्य करू शकतात.  क्रीडा मानसशास्त्र -शाळा/कॉलेज/विद्यापीठ क्रीडा संघ, व्यावसायिक संघ, क्रीडा पुनर्वसन विशेषज्ञ, क्रीडा संशोधन विशेषज्ञ आणि सल्लागार यांच्यासाठी क्रीडा मानसशास्त्र म्हणून काम करता येईल. 

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती

Image
   मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती (Study Methods of Psychology) :  मानसशास्त्र हे मानवी मन, मानसिक प्रक्रिया आणि वर्तन यांचा वैज्ञानिक अभ्यास आहे. मानसशास्त्राला मानवी वर्तनाचे विज्ञान म्हणतात . कारण मानसशास्त्रज्ञ देखील इतर शास्त्रज्ञांप्रमाणे विविध संशोधन पद्धतींचा उपयोग करून पद्धतशीर संशोधन आणि प्रयोग करतात. मानसशास्त्रीय संशोधनामध्ये जटिल मानसिक प्रक्रिया, मानवी वर्तन समजून घेणे आणि विविध प्रकारची माहिती (शारीरिक, मानसिक, शारीरिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती) गोळा केली जाते. मानसशास्त्रज्ञ विविध संशोधन पद्धती वापरतात. कारण एकाच संशोधन पद्धतीचा वापर केल्यास अचूक आणि विश्वासार्ह निष्कर्ष प्राप्त करणे कठीण असते. संशोधन माहिती गोळा करण्यासाठी ते कोणत्या पद्धतीचा वापर करतात, ते त्यांच्या संशोधनाच्या प्रकारावर अवलंबून असते. व्यापकपणे, प्रायोगिक संशोधन आणि अप्रायोगिक संशोधन या दोन प्रकारांमध्ये विभागले जाते. मानसशास्त्रीय संशोधनात वापरल्या जाणाऱ्या काही संशोधन पद्धती पुढील प्रमाणे आहेत.   अ) निरीक्षण पद्धत (Observation Method) : निरीक्षण पद्धत ही एक अप्रायोगिक...